पुणे - जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मंचर-लोंढेमळा येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून १२ एकर ऊस जळाला. या आगीत ६ लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे -
किसन माशेरे, अरुण लोंढे, विकास खानदेशे, जालिंदर लोंढे, कमलेश लोंढे, राधा माशेरे, मालुबाई लोंढे, लक्ष्मीबाई लोंढे, यमुनाबाई लोंढे, चंद्रकांत खानदेशे, निवृत्ती खानदेशे, दत्तात्रय माशेरे आणि अनिल लोंढे.
ऊस जळाल्याची घटना सोमवारी (दि. 24) दुपारी घडली. भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी जळालेला ऊस गाळपासाठी तातडीने नेला जाईल, अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली आहे.