पुणे - विभागातील एकूण 11 हजार 4 रूग्ण कोरोनावर मात करुन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत पुणे विभागात 17 हजार 929 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून सध्या अॅक्टिव रुग्णांची संख्या 6 हजार 151 इतकी आहे. विभागात आत्तापर्यंत 774 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 316 रूग्णांची स्थिती गंभीर असून ते निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61. 38 टक्के आहे तर मृत्यूचे प्रमाण 4.32 टक्के आहे. आज झालेल्या आढावा बैठकित विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी याबाबत माहिती दिली.
पुणे जिल्ह्यात एकूण 14 हजार 248 जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील 8 हजार 524 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या पुण्यात 5 हजार 172 अॅक्टीव रूग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत 552 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 304 रूग्ण गंभीर असून उर्वरित रूग्ण निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बऱया होणाऱया रुग्णांचे प्रमाण 59.83 टक्के आहे तर मृत्यूचे प्रमाण 3.87 टक्के इतके आहे.
राज्यातील कालच्या एकूण बाधित रूग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागाची संख्या 587 इतकी आहे. यात पुणे जिल्ह्यातील 563, सातारा जिल्ह्यातील 11, सोलापूर जिल्ह्यातील 8, सांगली जिल्ह्यातील 4 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 रुग्णाचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यात एकूण 781 कोरोनाबाधित रूग्ण असून यातील 592 बरे होवून घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात 151 अॅक्टीव रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 हजार 905 जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील 1 हजार 74 बरे होवून घरी गेले आहेत. तर 363 अॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोलापूरात आत्तापर्यंत 168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात एकूण 266 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद असून यातील 148 जण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात 110 अॅक्टीव रूग्ण आहेत तर 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 729 रूग्ण आढळले असून यातील 666 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव रुग्णांची संख्या 55 आहे, तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 1 लाख 30 हजार 573 नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 27 हजार 115 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 458 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 8 हजार 929 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 17 हजार 929 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.