ETV Bharat / state

पुणे विभागातील 1 लाख 40 हजार हेक्टर शेतीचे नुकसान, त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश - पुणे विभागातील 1 लाख 40 हजार हेक्टर शेतीचे नुकसान

गेल्या महिनाभरापासून राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस सुरू आहे. पुणे विभागातील सांगली, सोलापूर, पुणे या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस अजूनही सुरूच आहे. पुढील 48 तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणखी पाऊस झाला, तर पिकांचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज म्हैसेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

पुणे विभागातील 1 लाख 40 हजार हेक्टर शेतीचे नुकसान
author img

By

Published : Nov 2, 2019, 4:29 PM IST

सोलापूर - परतीच्या पावसाच्या तडाख्याने पुणे विभागातील 1 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे आणि फळ बागांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करावी. तसेच त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्वाधिक फटका सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष आणि डाळिंब बागांना बसला आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पंढरपुरात दिली.

पुणे विभागातील 1 लाख 40 हजार हेक्टर शेतीचे नुकसान

कार्तिकी यात्रा नियोजन बैठकीसाठी आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पुण्याचे महसूल आयुक्त दीपक म्हैसेकर हे पंढरपुरात आले होते. बैठकीपूर्वी त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुणे विभागात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली.

गेल्या महिनाभरापासून राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस सुरू आहे. पुणे विभागातील सांगली, सोलापूर, पुणे या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस अजूनही सुरूच आहे. पुढील 48 तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणखी पाऊस झाला, तर पिकांचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज म्हैसेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

पुणे विभागात सर्वाधिक सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे, तर सोलापूर जिल्ह्यात कांदा, ज्वारी, मका, बाजरी, तूर, सोयाबीन, द्राक्ष आणि डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सकाळी कासेगाव येथील नुकसान झालेल्या द्राक्ष, डाळिंब बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, यावेळी कासेगाव येथील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली. गेल्या वर्षी गारपीट होऊन नुकसान झाले होते. मात्र, अद्यापही मदत मिळाली नाही. आता यावेळी तरी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार वैशाली वाघमारे, विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.

Intro:mh_sol_02_pandharpur_grepes_nuksan_7201168
पूणे विभागातील 1 लाख 40 हजार हेक्टर शेतीचे नूकसान
परतीच्या पावसाने द्राक्ष आणि डाळिंबाचे प्रचंड नूकसान
सोलापूर -
परतीच्या पावसाच्या तडाक्याने पुणे विभागातील सुमारे 1 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे आणि फळ बागांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांची पहाणी करुन त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश महसूल अधिकार्यांना देण्यात आले आहेत. सर्वाधिक फटका सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष आणि डाळिंब बागांना बसला आहे,अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर यांनी पंढरपूरात दिली आहे. Body:कार्तिकी यात्रा नियोजन बैठकीसाठी आणि परतीच्या पावसाने झालेल्या नूकसानीची पाहणी करण्यासाठी पुण्याचे महसूल आयुक्त दीपक म्हैसेकर हे पंढरपुरात आले होते. बैठकीपूर्वी त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुणे विभागात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली. म्हैसेकर म्हणाले, गेल्या महिनाभरापासून राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस सुरु आहे. पुणे विभागातील सांगली, सोलापूर,पुणे या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस अजूनही सुरुच आहे. पुढील 48 तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणखी पाऊस झाला तर पिकांचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज ही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
पुणे विभागात सर्वाधिक सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे तर सोलापूर जिल्ह्यात कांदा, ज्वारी, मका,बाजरी तूर, सोयाबीन,द्राक्ष आणि डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान आय़ूक्त दीपक म्हैसेकर यांनी सकाळी कासेगाव येथील नुसकसान झालेल्या द्राक्ष,डाळिंब बागांची पहाणी करुन शेतकर्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.परंतु यावेळी कासेगांव येथील शेतकर्यांनी बागांच्या नुकसान झालेल्याची लवकर नुकसान भरपाई मिळावी,मागील वर्षी गारपीट होऊन नुकसान झालेल्यांची अद्याप मदत मिळाली नाही.आता यावेळची तरी नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची व्यथा शेतकर्यांनी अधिकार्यांपुढे मांडली.

यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार वैशाली वाघमारे, विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते

बाईट- डॉ. दीपक म्हैसकर, विभागीय आयूक्त, पुणे विभाग
बाईट- विजय देशमुख, शेतकरी कासेगाव ता. पंढरपूर Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.