परभणी - दुसरे लग्न करून पहिल्या पत्नीला तीन तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध जिंतूरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात सासरच्या मंडळींचा देखील समावेश असून हा तीन तलाकचा पहिलाच गुन्हा परभणी जिल्ह्यात दाखल आहे. या प्रकरणी शुक्रवारी पीडित महिलेने माध्यमांकडे आपली व्यथा मांडली आहे.
हे ही वाचा - बीडमध्ये विवाह हक्क कायद्यांतर्गत तलाकचा पहिलाच गुन्हा दाखल
जिंतूर शहरातील 25 वर्षीय महिलेचा विवाह पूर्णा येथील रहिवासी शेख अहमद शेख अफसर यांच्यासोबत 2015 साली झाला होता. लग्नाच्या तीन वर्षांनंतर पतीला स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासू पती मार्फत शारीरिक व मानसिक त्रास देत होते. पीडीत विवाहितेच्या आई-वडिलांनी सासू समक्ष पती व सासऱ्याला 5 लाख रुपये हॉटेल व्यवसायकरिता दिले. मात्र, तरीही नणंद, सासू, दीर यांनी पुन्हा शारीरिक व मानसिक छळ करत अनेक वेळा तीला उपाशी पोटी ठेवले आणि नंतर सासरच्या मंडळीने विवाहितेला न विचारताच तिच्या पतीचे दुसरे लग्न लावून दिले. अशी फिर्याद पीडितेने पोलिसांना दिली आहे.
हे ही वाचा - औरंगाबादेत 'तीन तलाक' विरोधात पहिला गुन्हा दाखल
दरम्यान, दुसऱ्या लग्नाची बाब समजल्यानंतर विवाहिता व तिची आई शहानिशा करण्यासाठी पूर्णा येथे गेले असता, पतीने विवाहितेस बेकायदेशीररित्या तीन तलाक देऊन उकळत्या गरम पाण्यात तिचे दोन्ही हात टाकले. यात विवाहितेचे दोन्ही हात गंभीरपणे भाजल्याचेही तिने सांगितले आहे.
हे ही वाचा - तीन तलाकला राष्ट्रावादीचा विरोधच, शरद पवारांनी सांगितले राज्यसभेतील गैरहजेरीचे कारण
या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून 18 सप्टेंबर रोजीच जिंतूर पोलिसात पती शेख अहमद, सासू शेख तस्लिम, सासरा शेख अफसर यांच्यासह सासरच्या 12 जणांविरुद्ध एकाच वेळी तीन तलाक देणे मुस्लीम महिला वटहुकूम 2018 कलम 4, भारतीय दंड संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार अशोक हिंगे हे करत आहे.
हे ही वाचा - तिहेरी तलाक सोबतच बहुपत्नीत्व सारख्या प्रथेवरही बंदी घालणे आवश्यक - प्रा. तांबोळी