ETV Bharat / state

परभणीत एकूण 1 हजार 122 कोरोना रुग्ण; 51 जणांचा मृत्यू - परभणीत एकूण 1 हजार 122 कोरोना रुग्ण

परभणी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सतत वाढत जाणारी संख्या चिंता वाढवणारी आहे. गेल्या काही दिवसापासून रोज सुमारे ७० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 122 झाली असून, आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला आहे; मात्र यातील 471 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.

-corona-patients-in-parbhani
परभणीत एकूण 1 हजार 122 कोरोना रुग्ण
author img

By

Published : Aug 11, 2020, 11:19 AM IST

परभणी - जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमणाने कहर केला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 122 झाली असून, आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला आहे; मात्र यातील 471 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे उर्वरीत 600 बधितांवर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात 72 नवीन रूग्ण आढळून आले असून, एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 238 संभाव्य रुग्ण दाखल झाले आहेत.

परभणी जिल्ह्यात गेल्या 40 दिवसात कोरोना बाधितांची संख्या तब्बल 11 पटीने वाढली आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 50 हून अधिक आहे. त्यात शुक्रवारी 82, शनिवारी 81, रविवारी 53 आणि सोमवारी रात्री उशिरापर्यंत 72 रुग्ण आढळून आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता तब्बल 1 हजार 122 इतकी झाली आहे; मात्र यातील 471 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत यातील 51 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार 600 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सोमवारी उशिरापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये परभणी शहरातील तब्बल 40 रुग्णांचा समावेश आहे. ज्यामध्ये तुराबुल हक नगर, कृष्णा नगर, मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, कुर्बान आली शहा नगर, सागर नगर, भाग्यनगर, सरलादेवी नगर, सुभाष रोड, माळी गल्ली, ईटलापुर मोहल्ला, लंगोट गल्ली, श्रावस्ती नगर, साई कॉर्नर, शास्त्री नगर, राम रहीम नगर, नटराज रंगमंदिर, समर्थ नगरी, धनुबाई प्लॉट, लहुजी नगर, सुयोग कॉलनी, भजन गल्ली, वर्मा नगर, अक्षदा मंगल कार्यालय परिसर, मराठवाडा प्लॉट, काझी मजीद, कोमटे गल्ली, सारनाथ कॉलनी, नागसेन नगर, शिवराम नगर, आदी परिसरातील रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय बोरी आणि तरोडा या ठिकाणी दोन रुग्ण आढळून आले आहेत.

तसेच सेलू शहरातील शाहूनगर, मारवाडी गल्ली आणि तालुक्यातील रेवा, तिडी पिंपळगाव, मोरेगाव या ठिकाणी 9 रुग्ण आढळले आहेत. तर गंगाखेड शहरातील वेताळ गल्ली, तालुक्यातील माखणी, भेंडेवाडी 3 आणि पाथरी शहरातील महिला गृह जवळील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच पाथरी तालुक्यातील सुगाव व डोंगरगाव 2 तसेच पूर्ण शहरातील रेल्वे कॉलनी, साळूबाई गल्ली, हरिनगर, गवळी गल्ली, दत्त मंदिर, आनंदनगर, सराफा बाजार, महाविर नगर आणि अंबिकानगर या परिसरात 11 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथे एक रुग्ण असून जिंतूर शहरात एक रुग्ण आढळले आहेत. याप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील एका रुग्णाचा परभणीत उपचार सुरू आहे.

समाधानाची बाब म्हणजे सोमवारी दिवसभरात 17 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये परभणी शहरातील 12 रुग्णांचा समावेश असून, ग्रामीण भागातील 4 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर मानवत शहरातील एका रुग्णाला देखील सुट्टी देण्यात आली आहे. मात्र शहरातील नागसेन नगरातील 65 वर्ष कोरोनाबाधित महिलेचा सकाळीच मृत्यू झाला.दरम्यान, परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 6 हजार 91 संभाव्य रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सध्या 600 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 907 संभाव्य रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल आहेत. यापूर्वी 4 हजार 558 रुग्णांनी आपला विलगिकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. मात्र 40 रुग्णांचे अहवाल अजूनही प्रयोगशाळेकडे प्रलंबित असून, यापूर्वी 52 जणांचे अहवाल फेटाळून लावण्यात आले आहेत. शिवाय 136 रुग्णांचे अहवाल अनिर्णायक असल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिलेला आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या चार दिवसात संभाव्य रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. सोमवारी जिल्हा रुग्णालयात तब्बल 238 संभाव्य रुग्ण दाखल झाल्याने चिंता कायम आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.