ETV Bharat / state

चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा; परभणीत ब्राह्मण समाजाचे जनतेला आवाहन

चीनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवानांना वीरमरण आल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या असून चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहिम सोशल मीडियावर चालवली जात आहे. परभणीत ब्राह्मण समाजाच्या युवकांनी चिनी राष्ट्राध्यक्षांचा पुतळा जाळून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

Agitation
आंदोलन
author img

By

Published : Jun 18, 2020, 4:49 PM IST

परभणी - संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट लादणाऱ्या चीनकडून आता भारतीय सीमेवर घुसखोरी होत असल्याने संपूर्ण देशभर संताप व्यक्त होत आहे. चीनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवानांना वीरमरण आल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या असून चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहिम सोशल मीडियावर चालवली जात आहे. परभणीत ब्राह्मण समाजाच्या युवकांनी चिनी राष्ट्राध्यक्षांचा पुतळा जाळून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

ब्राह्मण युवकांनी चिनी राष्ट्राध्यक्षाचा पुतळा जाळला

शहरातील विद्या नगरमध्ये युवकांनी आंदोलन करत चीन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनावेळी हुतात्मा भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर तरुणांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षाचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. सरकारने चीनला कठोर प्रत्युउत्तर द्यावे, याचा बदला घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. सर्वांनी चिनी मालावर बहिष्कार टाकून चीनला धडा शिकवावा, असेही आवाहन केले.

१५ जूनला गलवान खोऱ्यात परिसरात भारत आणि चीन सैन्यात चकमक उडाली. यावेळी झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवानांना विरमरण आले, तर चीनचेही काही सैनिक यात मारले गेले. मात्र, त्यांनी माहिती उघड केली नाही. दोन्ही देशांच्या दरम्यान असलेला तणाव कमी करण्यासाठी आणि सीमेवरील परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी दोन्ही देशांतील मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.