ETV Bharat / state

अतिवृष्टीसह पीक विम्याचे पैसे काढता येत नसल्याने 'स्वाभिमानी'चे जिल्हा बँकेत आंदोलन - परभणीत स्वाभिमानीचे जिल्हा बँकेत आंदोलन

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यामार्फत अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे उपलब्ध झाले आहेत. मात्र, बँक खात्यातील ही त्यांची स्वतःची रक्कम त्यांना काढणे अवघड झाले आहे. कारण बँक प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रत्येक शाखेत शेतकऱ्यांच्या भल्यामोठ्या रांगा लागत आहेत. ग्रामीण भागातील बँकांमध्ये दुपारनंतर पैसे पोहोचतात.

Parbhani
परभणी
author img

By

Published : Mar 15, 2020, 9:53 AM IST

परभणी - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर आलेल्या अतिवृष्टीच्या मदतीचे तसेच पीक विम्याचे पैसे काढता येत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याला जिल्हा बँकेचे व्यवस्थापन कारणीभूत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा बँकेत आंदोलन केले. तसेच तत्काळ शेतकऱ्यांना त्यांचे पैसे काढता यावेत, अशी मागणी यावेळी शेतकरी संघटनेने केली आहे.

जिल्हा बँकेत आंदोलन 'स्वाभिमानी'चे आंदोलन

हेही वाचा - परभणीत 'सामान्यज्ञान' परीक्षेत 28 कॉपीबहाद्दर निलंबीत

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यामार्फत अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे उपलब्ध झाले आहेत. मात्र, बँक खात्यातील ही त्यांची स्वतःची रक्कम त्यांना काढणे अवघड झाले आहे. कारण बँक प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रत्येक शाखेत शेतकऱ्यांच्या भल्यामोठ्या रांगा लागत आहेत. ग्रामीण भागातील बँकांमध्ये दुपारनंतर पैसे पोहोचतात. मात्र, शेतकरी सकाळपासूनच रांगेत उभा असतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे सकाळीच संबंधित शाखेमध्ये पोहोचले पाहिजेत. सध्या लग्नसराई आहे, शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज असते. त्यामुळे जिल्हा बँकेच्या खात्यावरील पैसे एटीएमच्या माध्यमातून काढता यायला पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर अनेक दिवसांपासून बँकेचे एटीएम बंद पडले आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

एस बँकेवरील निर्बंधामुळे आरटीजीएस देखील बंद केले आहेत. याप्रमाणेच काही गरीब शेतकरी शेतमजूरांच्या खात्यावर देखील दोन हजार रुपयांची रक्कम ठेवण्याचे बंधनकारक केले जात आहे. ही अट जाचक असून ती रद्द करावी, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत येऊन निदर्शने करण्यात आली. घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. या सर्व मागण्या तात्काळ मंजूर करा, अन्यथा बँकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे बँकेच्या व्यवस्थापकांना दिला आहे.

या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, भगवान शिंदे, दिगंबर पवार, शेख जाफर, मुंजाभाऊ लोंढे, केशव अरमल, नागेश शिंदे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

हेही वाचा - परभणीत पोलीस कॉन्स्टेबल पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.