ETV Bharat / state

पंचनाम्यास दिरंगाई..  कृषी अधीक्षकांच्या खुर्चीला घातला चपलांचा हार

बुधवारी (दि. ५ फेब्रुवारी) परभणी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात सडलेली फळे टाकून खुर्चीला चपलांचा हार घालत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

author img

By

Published : Feb 6, 2020, 7:55 AM IST

आंदोलक
आंदोलक

परभणी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (दि. ५ फेब्रुवारी) जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी कार्यालयात सडलेली फळे टाकून अधीक्षकांच्या खुर्चीला चपलांचा हार घालत आंदोलन केले. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात तालुक्यातील जवळपास दोनशे एकर वरील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलन करताना

परभणी तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये 2 फेब्रुवारी रोजी जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. यामध्ये प्रामुख्याने परभणी तालुक्यातील जाम, मांडाखळी शिवारात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे संत्री आणि इतर काही फळपिकांचे नुकसान झाले होते. मांडाखळी आणि जाम परिसरातील सुमारे शंभर ते दोनशे एकरवरील संत्रीचे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाला तात्काळ निवेदन देऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली होती.

हेही वाचा - कृषी शिक्षणाला हवाय व्यावसायिक दर्जा; परभणीच्या कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची मागणी

हवामान आधारित फळपीक योजनेअंतर्गत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांची होती. परंतु, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेत नसल्याने काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पेडगाव रोडवरील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, केशव अरमळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कृषी अधीक्षकांच्या दालनात जाऊन सडके फळ त्यांच्या टेबलावर रिचवले. कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याच्या खुर्चीला चपलांचा हार घालून जोरदार घोषणाबाजी करत दिरंगाईचा निषेधही केला.

हेही वाचा - मुलीची छेड काढणे पडले महाग, आरोपीला २ वर्ष सश्रम कारावास

Intro:परभणी - येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात सडके फळं टाकून खुर्चीला चपलांचा हार घालत जोरदार आंदोलन करण्यात आले. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात तालुक्यातील जवळपास दोनशे एकर वरील फळबागांचे नुकसान झाले असून, त्याचा पंचनामा करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.Body:परभणी तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये 2 फेब्रुवारी रोजी जोरदार अवकाळी पाऊस बरसला. यामध्ये प्रामुख्याने परभणी तालुक्यातील जाम, मांडाखळी शिवारात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे संत्री आणि इतर काही फळपिकांचे नुकसान झाले होते. मांडाखळी आणि जाम परिसरातील शंभर ते दोनशे एकरवरील संत्रीचे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाला तात्काळ निवेदन देऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली होती. हवामान आधारित फळपीक योजनेअंतर्गत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांची होती; परंतु कृषी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेत नसल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पेडगाव रोडवरील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, केशव अरमळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कृषी अधीक्षकांच्या दालनात जाऊन सडके फळ त्यांच्या टेबलावर रिचवले. कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याच्या खुर्चीला चपलांचा हार घालून जोरदार घोषणाबाजी करत दिरंगाईचा निषेधही केला.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_swabhimani_movment_in_dist_agri_office_vo_vis (ready to use)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.