ETV Bharat / state

परभणीत कोविड सेंटरमध्ये साप घुसल्याने रुग्णांची धावपळ - parbhani covid centre

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिंतूर रस्त्यावरील आयटीआय इमारतीत कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. आज या कोविड सेंटरमध्ये साप निघाल्याची घटना घडली. कोविड सेंटरमध्ये साप घुसल्याने एकच धावपळ उडाली. साप घुसल्याची माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सापाला पकडल्यानंतर रुग्णांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

snake-in-covidcentre
कोविड सेंटरमध्ये घुसला साप
author img

By

Published : Oct 26, 2020, 8:09 PM IST

परभणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिंतूर रस्त्यावरील आयटीआय इमारतीत कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. आज या कोविड सेंटरमध्ये साप निघाल्याची घटना घडली. कोविड सेंटरमध्ये साप घुसल्याने एकच धावपळ उडाली. साप घुसल्याची माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सापाला पकडल्यानंतर रुग्णांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

परभणी येथे कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी 200 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या या सेंटरमध्ये 26 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी दुपारच्या सुमारास इमारतीच्या तळ मजल्यावर एका कर्मचाऱ्याला साप दिसला. त्याने आरडाओरड केली, इमारतीत साप घुसल्याचे कळताच रुग्णांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान सर्पमित्र सौरभ पवार यांना फोन करून घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सापाला पकडले. दरम्यान हा साप पाणदिवड जातीचा असून, तो बिनविषारी असल्याची माहिती सर्पमित्र पवार यांनी दिली. सापाला पकडून त्याला जंगलात सोडून देण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.