परभणी - जिल्ह्यात शनिवारी 6 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 80 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झालाय. एक जण कोरोनामुक्त झाल्याने 77 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
परभणी जिल्हा रुग्णालयात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथील 1 तर परभणी शहराच्या ईटलापुर मोहल्ला भागातील 3 आणि जिंतुरच्या सावंगी भांबळे येथील 2 अशा एकुण 6 जणांचे अहवाल पॉसिटीव्ह आढळून आले आहेत.
ईटलापूर मोहल्ला येथील रुग्णांमध्ये ५ व ७ वर्षीय 2 बालकांसह एका ५७ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. तर नागठाणा येथे आढळलेला व्यक्ती ७० वर्षीय असून तो मुंबई येथून आलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आला होता. प्रमाणेच सावंगी भांबळे येथील कोरोनामुळे मरण पावलेल्या महिलेच्या संपर्कातील दोघांचा समावेश असल्याची माहिती माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णांच्या घराजवळील परिसर यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. त्या भागात निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, त्यांच्या सर्व सीमा सील करण्यात आलेल्या आहेत.