ETV Bharat / state

परभणीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली?, उद्योगमंत्री देसाईंचे खासदार जाधवांना आश्वासन

परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे म्हणून, खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणीकरांचे आंदोलन सुरू आहे. शासनाने परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यास या महाविद्यालयासाठी जागा लागणार आहे. प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी गंगाखेड रोडवरील जागा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहे. अशी माहिती परभणीचे खासदार संजय जाधव यांनी दिली आहे.

उद्योगमंत्री देसाईं यांची परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भेट घेतली

author img

By

Published : Sep 2, 2021, 8:51 PM IST

परभणी - येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी गंगाखेड रोडवरील जागा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहे. अशी माहिती परभणीचे खासदार संजय जाधव यांनी दिली आहे. त्यामुळे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणार्‍या जागेचाही प्रश्न निकाली निघेल असही ते म्हणाले आहेत. खासदार जाधव यांनी मुंबईत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली.

'विद्यापीठाची ५० तर महामंडळाची १०० एक्कर जागा उपलब्ध'

परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे म्हणून, खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणीकरांचे आंदोलन सुरू आहे. शासनाने परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यास या महाविद्यालयासाठी जागा लागणार आहे. दरम्यान, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची ५० एक्कर जमीन सदर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी देऊ केली आहे. तसेच, गंगाखेड रोडवरील ब्राह्मणगाव शिवारातील मराठवाडा विकास महामंडळाची १०० एक्कर जागाही उपलब्ध आहे.

'कोणतीही जागा उपलब्ध करून द्या'

या दोन्हीपैकी कोणत्याही एका ठिकाणची जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्यात यावी, म्हणून खासदार संजय जाधव यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ३० ऑगस्ट रोजी मुंबईत भेट घेतली होती. या भेटीत वरील दोन्ही जागेसंदर्भात उभयतांमध्ये सविस्तर चर्चा झाली. परभणीच्या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोणतीही जागा उपलब्ध करून द्या, असा आग्रह खासदार जाधव यांनी मंत्री देसाई यांच्याकडे धरला आहे.

'बेबाकी व ना-हरकत' नंतरच जमीन मिळणार'

या संदर्भात मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, गंगाखेड रोडवरील मराठवाडा विकास महामंडळाची ३ गटात १०० एक्कर जमीन आहे. त्यापैकी दोन गटाच्या जमिनीवर कर्ज घेतलेले आहे. हा कर्ज बोजा कमी करून बेबाकी व ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्यास ही जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी देता येईल. ही पूर्ण प्रक्रिया पार पाडून जमीन उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देसाई यांनी खासदार जाधव यांना यावेळी दिले असल्याचे खासदार संजय जाधव यांनी सांगितले.

'मोठा अडसर दूर होणार'

याप्रसंगी खासदार जाधव यांच्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, डॉ. राम शिंदे उपस्थित होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या जागेचा तिढा आता जवळपास सुटला असून, परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळविण्याच्या मार्गातील एक मोठा अडसर दूर होणार आहे, असा विश्वास खासदार जाधव यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - '70:30' चा प्रश्न मार्गी, आता लढा परभणीच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी- खासदार संजय जाधव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.