ETV Bharat / state

राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळेंनी पालिका अधिकाऱ्याला बदडल्याचा आरोप; गुन्हा दाखल - शिवीगाळ

दत्तराव विश्वनाथ तळेकर हे जिंतूर पालिकेतील कर वसुली अधिकारी आहेत. त्यांना घरी बोलावून 'माझे काम का केले नाहीस, असे म्हणत आमदार विजय भांबळे यांनी शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा तळेकर यांनी आरोप केला.

दत्तराव विश्वनाथ तळेकर
author img

By

Published : Jul 6, 2019, 10:07 PM IST

Updated : Jul 6, 2019, 10:38 PM IST

परभणी - पालिकेच्या कर निरीक्षकाला घरी बोलावून 'माझे काम का केले नाहीस, असे म्हणत आमदार विजय भांबळे यांनी शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी आमदार भांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तराव विश्वनाथ तळेकर असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

आमदार विजय भांबळेंसह दत्तराव तळेकर

दत्तराव विश्वनाथ तळेकर हे जिंतूर पालिकेतील कर वसुली अधिकारी आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत 'आमदार भांबळे यांनी त्यांना घरी बोलावून घेतले होते. यावेळी सांगितलेले काम तू का केले नाहीस, असे म्हणत ते काम करण्यासाठी दबाव आणला. परंतु या दबावाला नकार दिल्यानंतर आमदार भांबळे यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, आमदार भांबळे यांनी या पूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी केलेल्या शिविगाळीच्या क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यातच पुन्हा या घटनेचे जिल्ह्यातील अधिकारी वर्गात पडसाद उमटले आहेत. पोलीस ठाण्यात तळेकर यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा नोंदविण्यात येत असल्याने अधिकारी-कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. तसेच राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण घडल्याने विरोधी पक्षातील नेत्यांनी या प्रकरणत लक्ष घातले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर मोठा दबाव आल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे जिंतुर येथे नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची तारांबळ उडत आहे. दरम्यान, त्या अधिकाऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रारदेखील जिंतूर पोलिसांकडे करण्यात आली आहे.

Intro:परभणी - परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील आमदार विजय भांबळे पुन्हा एकदा एका अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी जिंतूर पालिकेतील एका कर निरीक्षकाला घरी बोलावून 'माझे काम का केले नाहीस, असे म्हणत शिवीगाळ तसेच मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले.Body:दरम्यान, त्या अधिकाऱ्याविरुद्ध ऑट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी फिर्याद देखील जिंतूर पोलिसांकडे करण्यात आली आहे.
दत्तराव विश्वनाथ तळेकर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते जिंतूर पालिकेतील कर वसुली अधिकारी आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत 'आमदार भांबळे यांनी त्यांना घरी बोलावून घेतले होते. यावेळी सांगितलेले काम तू का केले नाहीस, असे म्हहण ते काम करण्यासाठी दबाव आणला. परंतु या दबावाला नकार दिल्यानंतर आमदार भांबळे यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, आमदार भांबळे यांनी या पूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी केलेल्या शिविगाळीच्या क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यातच पुन्हा या घटनेचे जिल्ह्यातील अधिकारी वर्गात पडसाद उमटले आहेत. पोलिस ठाण्यात तळेकर यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा नोंदविण्यात येत असल्याने अधिकारी-कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. तसेच राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण घडल्याने विरोधी पक्षातील नेत्यांनी या प्रकरणत लक्ष घातले असून पोलीस प्रशासनावर मोठा दबाव आल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे जिंतुर येथे नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची तारांबळ उडत आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis with voConclusion:
Last Updated : Jul 6, 2019, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.