ETV Bharat / state

गंगाखेड साखर कारखान्याचे चेअरमन रत्नाकर गुट्टेंना न्यायालयीन कोठडी

औरंगाबाद विभागाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने कर्ज घोटाळा प्रकरणी गंगाखेड शुगरचे चेअरमन डाॅ. रत्नाकर गुट्टे व गंगाखेड शुगरचे मुख्य लेखाधिकारी यांना मंगळवारी दुपारी ३:३० वाजता अटक केली. गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे बनावट दस्तावेज करून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. शेतकऱ्यांची फसवणूक केली. या आरोपाखाली ५ जुलै २०१७ला गंगाखेड शुगर कारखान्यावर गुन्हा दाखल झाला

author img

By

Published : Mar 27, 2019, 9:23 AM IST

डाॅ. रत्नाकर गुट्टे

परभणी - शेतकऱ्यांच्या नावाने विविध बँकांमधून परस्पर हजारो कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याचा आरोप असणाऱ्या उद्योजक रत्नाकर गुट्टे व लेखाधिकारी दत्तात्रय गायकवाड यांना मंगळवारी सीबीआयने अटक केली आहे. त्यांना गंगाखेडच्या प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपचा सहयोगी पक्ष रासपचे नेते असलेल्या गुट्टे यांना इतके दिवस राजकीय शक्तीच्या आशीर्वादामुळे अटक होत नव्हती, असा आरोप गंगाखेडचे आमदार मधुसूदन केंद्रे यांनी केला. तसेच अखेर न्याय मिळत असतो, अशी भावनादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मधूसुधन केंद्रे

औरंगाबाद विभागाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने कर्ज घोटाळा प्रकरणी गंगाखेड शुगरचे चेअरमन डाॅ. रत्नाकर गुट्टे व गंगाखेड शुगरचे मुख्य लेखाधिकारी यांना मंगळवारी दुपारी ३:३० वाजता अटक केली. गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे बनावट दस्तावेज करून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. शेतकऱ्यांची फसवणूक केली. या आरोपाखाली ५ जुलै २०१७ला गंगाखेड शुगर कारखान्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर २० फेब्रुवारी २०१८ रोजी गंगाखेड शुगरचे मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार शर्मा, पुरवठा अधिकारी तुळशीराम अंभोरे, उस विकास अधिकारी बच्चुसिग पडवळ यांना औरंगाबादच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. त्यानंतर मंगळवारी औरंगाबाद गुन्हा अन्वेषण विभागाने याच कर्ज घोटाळ्याप्रकरणी गंगाखेड प्रथम वर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या अंतर्गत प्रथम वर्ग न्यायालयात उद्योगपती डॉ.रत्नाकर गुट्टे व मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय गायकवाड यांना हजर केले होते. या प्रकरणी गुट्टे यांना गंगाखेड न्यायालयाने १५ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, रत्नाकर गुट्टे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

असे आहेत गुट्टे यांचे कारनामे-

परभणी जिल्हयातील गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे चेअरमन आणि रासप नेते रत्नाकर गुट्टे यांनी २२ बोगस कंपन्या स्थापन करुन त्या माध्यमातून २६ हजार शेतकऱ्यांना व बँकांना कोट्यवधी रुपयांना फसवले, असा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. रत्नाकर गुट्टे व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण २२ कंपन्या नोंदणीकृत केल्याचे एसआयटीच्या तपासात आढळून आले. यापैकी बहुतांश कंपन्या या निव्वळ कागदावर असल्याचेही दिसून आले. रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स कारखान्याने हार्वेस्ट अँण्ड ट्रान्सपोर्ट योजनेखाली २०१५ मध्ये ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या नावे कर्जे उचलली. त्यापोटी शेतकऱ्यांना मिळालेली वाहने या कारखान्याला कामावर लावून कारखान्याकडे सर्व हप्त्यांची परतफेड करुन देखील कारखान्याने या रकमा बँकांना परतफेड केल्याच नाहीत. या रकमा थकीत झाल्यामुळे २० ते २५ लाख रुपयांच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांना बँकांच्या नोटीस घरपोच गेल्या. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.

गुट्टे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांच्या नावे शेकडो कोटी रुपयांचे पीककर्ज उचलल्याची व ती थकवल्याने बँकांनी शेतकऱ्यांकडून वसुलीचा तगादा लावल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यासंदर्भात न्यायालयाने आदेश देऊनही त्यावर कुठलीच कारवाई झाली नव्हती. रत्नाकर गुट्टे यांच्यावर ५ जुलै २०१७ रोजी भादंवि कलम ४०६, ४०९, ४१७, ४२० आणि ४६७, ४६८, ४७१, १२०-ब अन्वये गुन्हा दाखल आहे. गुट्टे यांनी त्यांच्या विविध कंपन्यांवर शून्य उलाढाल असतानाही बनावट कागदपत्रे तयार करुन सुमारे साडेतीन ते साडेपाच हजार कोटी रुपयांची कर्जे घेतली असल्याचे त्यांच्यावर आरोप असून त्याखाली ही कारवाई करण्यात आली.

हा तर महाराष्ट्राचा नीरव मोदी-

दरम्यान, हे प्रकरण चव्हाट्यावर आणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा गुट्टे यांचे प्रतिस्पर्धी मधूसुधन केंद्रे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, गुट्टे विरोधात आपण सर्व पुरावे सादर केले होते. गंगाखेड शुगर्स आणि इतर कंपन्यांच्या माध्यमातून झालेला पैशांचा गैरप्रकार उघडकीस आणला होता. परंतु ते एवढे दिवस सत्तेच्या जोरावर बाहेर फिरायचे. मात्र न्याय देवतेवर माझा पूर्ण विश्वास होता. 'रत्नाकर गुट्टे हा महाराष्ट्रातील छोटा नीरव मोदी असल्याचे या सगळ्या घोटाळ्यातून समोर आले असून गुट्टे यास अटक झाल्याचं कळताच शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचेही केंद्रे म्हणाले.

Intro:
परभणी - शेतकऱ्यांच्या नावाने विविध बँकांमधून परस्पर हजारो कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याचा आरोप असणाऱ्या उद्योजक रत्नाकर गुट्टे व लेखाधिकारी दत्तात्रय गायकवाड यांना आज (मंगळवारी) सीबीआयने अटक केली आहे. त्यांना गंगाखेडच्या प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपचा सहयोगी पक्ष रासपचे नेते असलेल्या गुट्टे यांची एवढे दिवस राजकीय शक्तीपूढे अटक होत नव्हती, असा आरोप गंगाखेडचे आमदार मधुसूदन केंद्रे यांनी केला असून अखेर न्याय मिळतोच, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.Body:औरंगाबाद विभागाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने कर्ज घोटाळा प्रकरणी गंगाखेड शुगरचे चेअरमन डाॅ. रत्नाकर गुट्टे व गंगाखेड शुगरचे मुख्य लेखाधिकारी यांना आज (मंगळवारी) दुपारी 3:30 वाजता अटक करण्यात आली. गंगाखेड शुगर कारखाण्याने शेतकऱ्यांच्या नावे बनावट दस्तावेज करून कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले. शेतक-याची फसवणूक केली. या आरोपाखाली 5 जुलै 2017 रोजी गंगाखेड शुगर कारखान्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 20 फेब्रुवारी 2018 रोजी गंगाखेड शुगरचे मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार शर्मा, पुरवठा अधिकारी तुळशीराम अंभोरे, उस विकास अधिकारी बच्चुसिग पडवळ यांना औरंगाबादच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. त्यानंतर आज (मंगळवारी 26 मार्च रोजी) औरंगाबाद गुन्हा अन्वेषण विभागाने याच कर्ज घोटाळ्याप्रकरणी गंगाखेड प्रथम वर्ग न्यालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या अंतर्गत प्रथम वर्ग न्यायालयात उद्योगपती डॉ.रत्नाकर गुट्टे व मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय गायकवाड यांना हजर केले होते. या प्रकरणी गुट्टे यांना गंगाखेड न्यायालयाने 15 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, रत्नाकर गुट्टे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

"असे आहेत गुट्टे यांचे कारनामे'

दरम्यान, परभणी जिल्हयातील गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे चेअरमन आणि रासप नेते रत्नाकर गुट्टे यांनी 22 बोगस कंपन्या स्थापन करुन त्या माध्यमातून 26 हजार शेतकऱ्यांना व बँकांना कोट्यवधी रुपयांना फसवले, असा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. रत्नाकर गुट्टे व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण 22 कंपन्या नोंदणीकृत केल्याचे एसआयटीच्या तपासात आढळून आले असून यापैकी बहुतांश कंपन्या या निव्वळ कागदावर असल्याचेही दिसून आले. रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स कारखान्याने हार्वेस्ट अँण्ड ट्रान्सपोर्ट योजनेखाली 2015 मध्ये 600 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या नावे कर्जे उचलली. यापोटी शेतकऱ्यांना मिळालेली वाहने या कारखान्याला कामावर लावून कारखान्याकडे सर्व हप्त्यांची परतफेड करुन देखील कारखान्याने या रकमा बँकांना परतफेड केल्याच नाहीत. या रकमा थकीत झाल्यामुळे 20 ते 25 लाख रुपयांच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांना बँकांच्या नोटीसा घरपोच गेल्या. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. गुट्टे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांच्या नावे शेकडो कोटी रुपयांचे पीककर्ज उचलल्याची व ती थकवल्याने बँकांनी शेतकऱ्यांकडून वसुलीचा तगादा लावल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यासंदर्भात न्यायालयाने आदेश देऊनही त्यावर कुठलीच कारवाई झाली नव्हती. रत्नाकर गुट्टे यांच्यावर 5 जुलै 2017 रोजी भादंवि कलम 406, 409, 417, 420 आणि 467, 468, 471, 120-ब अन्वये गुन्हा दाखल आहे. गुट्टे यांनी त्यांच्या विविध कंपन्यांवर शून्य उलाढाल असतानाही बनावट कागदपत्रे तयार करुन सुमारे साडेतीन ते साडेपाच हजार कोटी रुपयांची कर्जे घेतली असल्याचे त्यांच्यावर आरोप असून त्याखाली ही कारवाई करण्यात आली.

"हा तर महाराष्ट्राचा निरव मोदी"

दरम्यान, हे प्रकरण चव्हाट्यावर आणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा गुट्टे यांचे प्रतिस्पर्धी मधूसुधन केंद्रे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, गुट्टे विरोधात आपण सर्व पुरावे सादर केले होते. गंगाखेड शुगर्स आणि इतर कंपन्यांच्या माध्यमातून झालेला पैशांचा गैरप्रकार उघडकीस आणला होता. परंतु ते एवढे दिवस सत्तेच्या जोरावर बाहेर फिरायचे. मात्र न्याय देवतेवर माझा पूर्ण विश्वास होता. 'रत्नाकर गुट्टे हा महाराष्ट्रातील छोटा नीरव मोदी असल्याचे या सगळ्या घोटाळ्यातून समोर आले असून गुट्टे यास अटक झाल्याचं कळताच शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचेही केंद्रे म्हणाले.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत फोटो रत्नाकर गुट्टे, गंगाखेड शुगर,
- bite :- आमदार मधुसूदन केंद्रे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.