ETV Bharat / state

गंगाखेड मतदारसंघासाठी रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातूनच भरला उमेदवारी अर्ज - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातूनच आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत उमेदवारी अर्ज भरला आहे.

रत्नाकर गुट्टे
author img

By

Published : Oct 4, 2019, 3:20 PM IST

परभणी - गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातूनच आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत उमेदवारी अर्ज भरला आहे. आज (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या निवडणूक प्रतिनिधी व सुचक, अनुमोदक यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केला.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातूनच आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत उमेदवारी अर्ज भरला

हेही वाचा... वाचा कोणत्या मतदारसंघातून कोणी दाखल केला उमेदवारी अर्ज?

रत्नाकर गुट्टे यांनी 2014 च्या निवडणुकीत रासपच्या वतीने गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना अगदी थोड्या फरकाने पराभव स्वीकाराव्या लागला होता. यावर्षी मात्र गुट्टे यांना कारागृहातूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला आहे. यामुळे ते यंदा कारागृहातूनच निवडणूक लढवतील.

का आहेत गुट्टे कारागृहात ?

गंगाखेड शुगर लिमिटेडचे चेअरमन उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावे हजारो कोटी रुपयांचे कर्ज उचलून गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. ईडीच्या तक्रारीवरून त्यांच्यावर आरोप दाखल झाले असून, सध्या ते या प्रकरणात परभणीच्या जिल्हा कारागृहात आहेत.

हेही वाचा... आदित्य ठाकरेंविरोधात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात

2014 निवडणूकीत थोड्याफार फरकाने पराभव झाल्यामुळे रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे ठरवले होते. मात्र त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे त्यांना कारागृहात जावे लागले. जामीनाचे प्रयत्न करुनही जामीन न झाल्याने अखेरीस त्यांनी आता कारागृहातुनच शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

गुट्टेंच्या प्रतिनिधींनी त्यांची अर्जावर कारागृहातून स्वाक्षरी आणलीय यानंतर तो अर्ज गंगाखेडच्या तहसीलदारांकडे जमा केला आहे. त्यांच्या वतीने राजेश काशिनाथ फड, संदीप फड, शेंडगे सय्यद सिराज, कृष्णा सोळंके, किशनराव भोसले, साहेबराव सुरनर आदी सूचक आणि अनुमोदकांनी त्यांचा अर्ज दाखल केला आहे.

Ratnakar Gutte filed his nomination for Gangakhed constituency
रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड मतदारसंघासाठी कारागृहातूनच भरला उमेदवारी अर्ज

हेही वाचा... जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवार अर्ज दाखल​​​​​​​

प्रथमच कारागृहातून उमेदवारी अर्ज

परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या उमेदवाराने कारागृहातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे गुट्टे यांच्या अर्जाची जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे. मात्र आता येणाऱ्या काळात ते प्रचार यंत्रणा नेमकी कशी राबवतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:परभणी - 2014 च्या निवडणुकीत रासपच्या वतीने गंगाखेड विधान सभेची निवडणूक लढवून अगदी थोड्या फरकाने पराभव स्वीकाराव्या लागलेल्या उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी कारागृहातूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज (शुक्रवारी) शेवटच्या दिवशी त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज तहसीलदारांकडे जमा केला असून ते आता कारागृहातून निवडणूक लढवतील.Body:गंगाखेड शुगर लिमिटेडचे चेअरमन उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्या वर शेतकऱ्यांच्या नावे हजारो कोटी रुपयांचे कर्ज उचलून गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. ईडीच्या तक्रारीवरून त्यांच्यावर आरोप दाखल झाले असून, सध्या ते या प्रकरणात परभणीच्या जिल्हा कारागृहात आहेत. परंतु मागच्या वेळी थोड्या फार फरकाने पराभव झाल्यामुळे रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा चंग बांधला होता. मात्र कारवाईमुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले. खुप प्रयत्न करुनही त्यांचा जामीन होत नाहीये. त्यामुळे आता त्यांनी कारागृहातुनच आज शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या सहकाऱ्यांनी अर्जावर कारागृहातून त्यांची स्वाक्षरी आणली असून, गंगाखेडच्या तहसीलदारांकडे तो अर्ज जमा केला आहे. त्यांच्या वतीने राजेश काशिनाथ फड, संदीप फड, शेंडगे सय्यद सिराज, कृष्णा सोळंके, किशनराव भोसले, साहेबराव सुरनर आदी सूचक आणि अनुमोदकांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

"प्रथमच कारागृहातून उमेदवारी अर्ज"

परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या उमेदवाराने कारागृहातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याची जिल्ह्यात जोरदार चर्चा होत असून, येणाऱ्या काळात ते प्रचार यंत्रणा नेमकी कशी राबवतात ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- photo :- Ratnakar gutte
- photo & vis :- उमेदवारी अर्ज दाखल करतांना रत्नाकर गुट्टे यांचे सूचक आणि अनुमोदक.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.