परभणी - लॉकडाऊनच्या फावल्या वेळात चित्रकलेची आवड जोपासणाऱ्या परभणीतील एका विद्यार्थ्यांचे थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतूक केले आहे. या विद्यार्थ्याने देशातील महान विभूतीसोबतच नरेंद्र मोदी यांचे रेखाचित्र काढून त्यांना ते एका पत्रासोबत पाठवले होते. पंतप्रधान मोदींनी मात्र या विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याला पत्राद्वारे त्याच्या कलेचे भरभरून कौतूक केले आहे. अजय जितेंद्र डाके असे चित्र काढणाऱ्या मुलाचे नाव आहे. अजय हा वैभवनगरातील बालविद्या मंदिरमधील इयत्ता सहावीत शिकत असून त्याने काढलेल्या चित्राचे नरेंद्र मोदी यांनी कौतूक करत त्याला पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
अजयने व्यक्त केली होती देशाची सेवा करायची इच्छा -
पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात अजय जितेंद्र डाके याने 'आपणास चित्र काढण्याची मोठी आवड आहे. चित्रकलेबाबतचे आपले विश्व काही वेगळेच आहे. तसेच चित्रकलेच्या माध्यमातून आपले विचार प्रकट करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. भविष्यात एका प्रामाणिक नागरिकाप्रमाणे देशाची सेवा करायची इच्छा असल्याची भावना अजयने व्यक्त केली केले होती.
शिक्षणाधिकाऱ्यांसह, शिक्षकांनीही केले अभिनंदन -
दरम्यान, अजय डाके याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती मिळल्यानंतर त्याचे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहूळ यांच्यासह डॉ. विवेक नावंदर, मुख्याध्यापक बोराडे, शिक्षक उमेश मेहूनकर यांच्यासह मित्रांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा - अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचा शिवसेना प्रवेश आज नव्हे तर उद्या