ETV Bharat / state

परभणीत ईदच्या नमाजमध्ये पूरग्रस्तांसाठी दुवा आणि निधी संकलन

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोमवारी परभणीत ईदगाह मैदानावर बकरी ईदच्या नमाजसाठी एकत्र जमलेल्या मुस्लीम बांधवांनी दुवा केली. सोबतच मदतीसाठी निधी देखील संकलित केला.

author img

By

Published : Aug 12, 2019, 6:07 PM IST

परभणीत ईदच्या नमाजमध्ये पूरग्रस्तांसाठी दुवा आणि निधी संकलन

परभणी- सोमवारी परभणीत ईदगाह मैदानावर बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. यावेळी कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी दुवा करण्यात आली. पूरग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून यावेळी पैशाच्या स्वरुपात निधी संकलीत करण्यात आला.

मराठवाड्यात अवकृपा दाखवणारा वरूण राजा पश्चिम महाराष्ट्रात मात्र थैमान घालत आहे. या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर सांगली आणि परिसरात महापूर आला आहे. हजारो कुटुंबांना या पूराचा फटका बसला आहे. या अस्मानी संकटात अनेक संसार उघड्यावर आले आहेत. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सोमवारी परभणीत ईदगाह मैदानावर बकरी ईदच्या नमाजसाठी एकत्र जमलेल्या मुस्लिम बांधवांनी दुवा केली. सोबतच मदतीसाठी निधी देखील संकलित केला.

राज्यातील कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह बऱ्याच भागात महापुराने थैमान घातले आहे. अनेकजण मृत्यूमुखी पडले. अनेक मुकी जनावरे वाहून गेली, तर लाखो घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे देशभरातून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी लाखो हात सरसावले आहेत. परभणी शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवानी सोमवारी सकाळी बकरी ईद साजरी केली. यावेळी नमाजनंतर पूरग्रस्तांसाठी दुआ करण्यात आली. सामाजिक संघटनांकडून यावेळी पूरग्रस्तांसाठी निधी संकलीत करण्यात आला. हा जमा झालेल्या निधीचा वापर पूरग्रस्तांसाठी करण्यात येणार आहे. मुस्लीम बांधवांनी शक्य होईल तेवढी मदत केली. निसर्गाने जरी अवकृपा केली असली तरी माणुसकीचे लाखो हात पूरग्रस्तांसाठी धावून जात असल्याचे दिसून येत आहे.

Intro:परभणी - मराठवाड्यात अवकृपा दाखवणारा वरूणराजा पश्चिम महाराष्ट्रात मात्र मनसोक्त बरसत आहे. परिणामी कोल्हापूर-सांगली आणि परिसरात महापूर आला आहे. ज्यामुळे हजारो कुटुंब उघड्यावर आले असून, त्यांच्या मदतीसाठी आज (सोमवारी) परभणीत ईदगाह मैदानावर बकरी ईदच्या नमाज निमित्त एकत्र जमलेल्या मुस्लिम बांधवांनी दुवा तर केलीच ; सोबतच मदतीसाठी निधी देखील संकलित केला आहे.Body:राज्यातील कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह बऱ्याच भागात महापुराने थैमान घातले आहे. या अस्मानी संकटात अनेक संसार उघड्यावर आले आहेत. अनेकजण मृत्यूमुखी पडले. अनेक मुकी जनावरे वाहून गेली, तर लाखोघरांची निसर्गाने अक्षरशः लूट केली आहे. त्यामुळे देशभरातुन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी लाखो हात सरसावले आहेत. त्यानुसार परभणी शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवानी आज सकाळी बकरी ईद साजरी केली. यावेळी नमाजनंतर पुरग्रस्तांसाठी दुआ करण्यात आली. तर सामाजिक संघटनेकडून पुरग्रस्तांसाठी निधी देखील संकलीत करण्यात येत आहे. जमा झालेल्या निधीचा वापर पुरग्रस्तांसाठी करण्यात येणार आहे. या ठिकाणी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात आपल्याला शक्य होईल तेवढया प्रमाणात मदत करत होते. त्यामुळे निसर्गाने जरी अवकृपा केली असली तरी माणुसकीचे लाखो हात पुरग्रस्तांसाठी धावून जात असल्याचे दिसून येत आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- visuals & bytesConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.