ETV Bharat / state

परभणी : चार दुचाकींसह आरोपी जेरबंद, मोठी टोळी हाती लागण्याची शक्यता - parbhani

पोलिसांनी सेलू कॉर्नरवर सापळा रचून दशरथ शिंदे याला जेरबंद केले. आरोपीसोबत  दुचाकी चोरांची मोठी टोळी असून त्यांच्याकडून आणखीन काही दुचाकी मिळण्याची शक्यता आहे.

परभणी : चार दुचाकींसह आरोपी जेरबंद
author img

By

Published : Apr 30, 2019, 10:36 AM IST

परभणी - कर्नाटक, तेलंगणासह परभणी तसेच गंगाखेड येथून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपासोबत चार साथीदार असल्याची माहिती पुढे आली असून, यामुळे दुचाकी चोरांची मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

दशरथ अण्णा शिंदे (वय २५ रा. ज्ञानेश्वर नगर पाथरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने परभणी शहरातील न्यायालय परिसरातून एक दुचाकी चोरली होती. त्यानंतर गंगाखेड शहर, तेलंगणा तसेच कर्नाटकातून प्रत्येकी एक दुचाकी चोरून आणली होती. आरोपी हा सेलू येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी सेलू कॉर्नरवर सापळा रचून दशरथ शिंदे याला जेरबंद केले. आरोपीसोबत दुचाकी चोरांची मोठी टोळी असून त्यांच्याकडून आणखीन काही दुचाकी मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले असून, त्यांच्याकडून या चार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, दशरथ शिंदे याला अटक करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकते, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबल, जमीर फारूकी, गौस पठाण, अरुण कांबळे आदींच्या पथकाने परिश्रम घेतले.

Intro:परभणी - कर्नाटक, तेलंगणासह परभणी तसेच गंगाखेड येथून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला परभणीच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या आरोपीकडून चार दुचाकी जप्त केले आहेत. शिवाय या आरोपीच्या तपासात त्याचे इतर चार साथीदार असल्याची माहिती पुढे आली असून, यामुळे दुचाकीचोरांची मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. Body:दशरथ अण्णा शिंदे (वय 25 रा. ज्ञानेश्वर नगर पाथरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने परभणी शहरातील न्यायालय परिसरातून एक दुचाकी चोरली होती. त्यानंतर गंगाखेड शहरातून एक आणि तेलंगणा तसेच कर्नाटकातून प्रत्येकी एक दुचाकी चोरून आणली होती. या बाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार तो सेलू येथे असल्याचे समजले. पोलिसांनी सेलु कॉर्नरवर सापळा रचून मोठ्या शिताफीने दशरथ शिंदे याला जेरबंद केले. शिंदे यांच्या तपासात मोटरसायकल चोरी करण्यासाठी त्याला आणखी चार साथीदार मदत करत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार ही एक दुचाकी चोरांची मोठी टोळी असून त्यांच्याकडून आणखीन काही दुचाकी मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले असून, त्यांच्याकडून या चार साथीदारांचा शोध घेतल्या जात आहे. दरम्यान, दशरथ शिंदे याला अटक करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकते, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबल, जमीर फारूकी, गौस पठाण, अरुण कांबळे आदींच्या पथकाने परिश्रम घेतले.
- गिरीराज भगत, परभणी
- सोबत :- आरोपीसह पोलिसांचा फोटो, आणि एसपी ऑफिस चे vis.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.