ETV Bharat / state

इंधनाचे दर आज पुन्हा भडकले; परभणीत पेट्रोल 122.62, तर डिझेल 105.21 रुपये लिटर

इंधनाचे दर आज मंगळवारी देखील पुन्हा भडकले. त्यात उच्चांकी दरामुळे परभणीकरांना ( Petrol Diesel rate hike in Parbhani ) चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. परभणीत आज पेट्रोल 122.62 पैसे प्रति लिटर दराने विक्री होत आहे. तर, डिझेल शंभरीच्या पार गेले असून, 105.21 पैसे दराने विक्री होत आहे.

petrol Diesel rate hike in Parbhani
पेट्रोल दरवाढ परभणी
author img

By

Published : Apr 5, 2022, 8:15 AM IST

Updated : Apr 5, 2022, 9:25 AM IST

परभणी - इंधनाचे दर आज मंगळवारी देखील पुन्हा भडकले. त्यात उच्चांकी दरामुळे परभणीकरांना ( Petrol Diesel rate hike in Parbhani ) चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. परभणीत आज पेट्रोल 122.62 पैसे प्रति लिटर दराने विक्री होत आहे. तर, डिझेल शंभरीच्या पार गेले असून, 105.21 पैसे दराने विक्री होत आहे. तसेच, पावर पेट्रोल 129 रुपयांवर गेले आहे. महत्त्वाचे म्हणजे, परभणीत गेल्या 14 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 10 रुपयांची वाढ झाली आहे.

देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून मुंबईत पेट्रोल, डिझेलच्या दरात ८४ पैशांची वाढ झाली आहे. तर दिल्लीत पेट्रोल, डिझेल ८० पैशांनी महागले आहे. दिवसेंदिवस वाढत्या इंधन दरवाढीमुळे वाहन चालक हैराण झाले आहेत. दिल्लीत आज पेट्रोल १०४, डिझेल ९५.८७ चे दर आहेत. सोमवारच्या तुलनेत आज लिटरमागे ८० पैशांची वाढ झाली आहे. तर मुंबईत पेट्रोल ११९.६७, डिझेल १०३.९२ रुपये प्रतिलिटर असून अनुक्रमे ८४ आणि ८५ पैशांची वाढ झाली आहे. २२ मार्चनंतर सुधारणेतील साडेचार महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर आजची तेरावी दरवाढ आहे.

हेही वाचा - काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा काढण्याची शक्यता - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोल - डिझेलच्या किंमतीने परभणीतील रेकॉर्ड कायम ठेवला आहे. राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीकारांना घ्यावे लागत आहे. रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर इंधनाचे भाव दररोज वाढत आहेत. त्यात परभणीला सर्वाधिक फटका सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

पेट्रोल वर्षभरात 23 रुपयांनी महागले : विशेष म्हणजे, गतवर्षी मार्च महिन्यात परभणीत पेट्रोलचे दर 99 रुपये 66 पैसे प्रति लिटर एवढे होते, तर सप्टेंबर महिन्यात 109.8 रुपये आणि डिसेंबर महिन्यात 113 रुपये 11 पैसे होते. त्यानंतर काही महिने भाव स्थिर राहिले. आता रशिया - युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दरवाढ होताना दिसून येत आहे. त्यानुसार 22 मार्चपासून पुन्हा एकदा दरवाढ सुरू झाली. त्यात आज 14 व्या दिवशी पुन्हा 84 पैशांची वाढ झाली असून, आज मंगळवारी 122 रुपये 62 पैसे प्रति लिटर दराने पेट्रोल ग्राहकांना खरेदी करावे लागत आहे.

डिझेलमध्येही 16 रुपयांची वाढ : पेट्रोल प्रमाणे डिझेलही शंभरीच्या पार गेले आहे. डिझेलमध्ये देखील गेल्या वर्षभरात तब्बल 16 रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी मार्च महिन्यात परभणीत डिझेल 89 रुपये 26 पैसे, तर सप्टेंबर महिन्यात 97 रुपये 17 पैसे एवढ्या दराने विक्री झाले. त्यानंतर आत्तापर्यंत काहीसे स्थिर असणारे डिझेलचे दर पुन्हा भडकले आहेत. त्यानुसार आज मंगळवारी 83 पैश्यांची वाढ होऊन 105.21 पैसे एवढ्या दराने डिझेलची विक्री होत आहे.

सर्वाधिक दराचे हे आहे कारण : परभणी जिल्ह्याच्या जवळ इंधनाचा कुठलाही डेपो नाही. त्यामुळे, जिह्यातील भारत पेट्रोलियमच्या पंपाना 330 किमी दूर असलेल्या मनमाड डेपोतून इंधन पुरवठा होतो. तर, हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपाना देखील सुमारे 300 किमी दूर असलेल्या सोलापूर येथून पुरवठा केला जातो, ज्यामुळे इंधनाच्या वाहतुकीवर मोठा खर्च होतो, ज्याची वसुली कंपन्या ग्राहकांकडून करतात. त्यामुळे, परभणी परिसरात किंवा जवळ असलेल्या एखाद्या मोठ्या शहरात इंधनाचा डेपो उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. शासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पहावयास मिळते.

परभणीत महागाई वाढली : पेट्रोल प्रमाणेच डिझेलच्या भावात देखील वाढ होत आहे. परिणामी मालवाहतूक महागली आहे. त्यामुळे, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाजीपाला व अन्नधान्यांची दरवाढ सुरू झाली आहे. तसेच, बहुतांश प्रवासी गाड्या, ऑटोरिक्षा, टेम्पो, ट्रक डिझेलवर चालतात. त्यामुळे, प्रवाशी वाहतुकीबरोबरच माल वाहतुकीचा खर्च देखील वाढला आहे. याचा प्रवास तसेच व्यापारावर देखील विपरीत परिणाम झाला आहे. हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे, इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी होत आहे.

राज्यातील इतर काही शहरातील पेट्रोल दर खालीलप्रमाणे

पुणे

पेट्रोल - 119.13

डिझेल - 101.84

कोल्हापूर

पेट्रोल - 118.86

डिझेल - 101.17

नाशिक

पेट्रोल - 120.03

डिझेल -102.72

औरंगाबाद

पेट्रोल - 120.50

डिझेल - 103.20

चंद्रपूर

पेट्रोल - 119.41

डिझेल - 102.13

हेही वाचा - Elderly Couple Murder Parbhani : परभणीत वृद्ध दाम्पत्याचा निर्घृण खून; मेहुणीसोबत तरुण आला होता मुक्कामी!

Last Updated : Apr 5, 2022, 9:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.