ETV Bharat / state

परभणी जिल्ह्यात 14 ठिकाणी नाकेबंदी तरीही 1 हजार 538 जणांची घुसखोरी; सर्व होम क्वारंटाईन

author img

By

Published : Apr 22, 2020, 8:26 PM IST

पुणे, मुंबई, औरंगाबाद तसेच इतर शहरांमधून तब्बल 1 हजार 538 लोकांनी गैरमार्गाने जिल्ह्यात घुसखोरी केली आहे. या सर्वांना शोधून पोलिसांनी होमक्वारंटाईन केले आहे. याशिवाय पुढील काळात कुठल्याही व्यक्तीने घुसखोरी करू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या 83 गावांमध्ये पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावातील प्रमुख व्यक्तींचे पथक तयार करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यात 14 ठिकाणी नाकेबंदी तरीही 1 हजार 538 जणांची घुसखोरी; सर्व होम क्वारंटाईन
परभणी जिल्ह्यात 14 ठिकाणी नाकेबंदी तरीही 1 हजार 538 जणांची घुसखोरी; सर्व होम क्वारंटाईन

परभणी - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यात 14 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. तरीदेखील पुणे, मुंबई, औरंगाबाद तसेच इतर शहरांमधून तब्बल 1 हजार 538 लोकांनी गैरमार्गाने जिल्ह्यात घुसखोरी केली आहे. या सर्वांना शोधून पोलिसांनी होमक्वारंटाईन केले आहे. याशिवाय पुढील काळात कुठल्याही व्यक्तीने घुसखोरी करू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या 83 गावांमध्ये पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावातील प्रमुख व्यक्तींचे पथक तयार करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कोरोनाच्या दहशतीने संपूर्ण जग हादरून गेले आहे. मात्र त्याच कोरोना विषाणूपासून दूर राहिलेल्या परभणीत मागच्या गुरुवारी पुणे येथून चोरट्या मार्गाने आलेल्या एका तरुणाची 'कोरोना' चाचणी पॉसिटीव्ह निघाली. ज्यामुळे जिल्हा प्रशासनाची झोप उडाली. विशेषतः पोलीस प्रशासनाने प्रचंड बंदोबस्त लावून देखील मोठ्या प्रमाणात अन्य शहरातून घुसखोरी सुरूच आहे. गेल्या काही दिवसात परभणी जिल्ह्यातील 14 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे, असे असले तरी चोरट्या मार्गाने तसेच नाक्यांवर पोलिसांच्या गैरहजेरीत जिल्ह्याच्या सीमा ओलांडून येणाऱ्यांची संख्या आतापर्यंत 1 हजार 538 एवढी झाली आहे. या सर्वांना पोलिसांनी शोधून काढले असून त्या सर्वांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर आरोग्य पथक निगराणी ठेवून असल्याची माहिती पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली.

यापुढे घुसखोरांना आळा घालण्यासाठी परभणीच्या जिल्हा पोलीस दलाने परभणी जिल्ह्यातील अन्य जिल्ह्यांच्या सीमा असलेल्या 83 गावांवर विशेष लक्ष ठेवले आहे. या गावांच्या हद्दीत मधून परभणी जिल्ह्यात कोणीही प्रवेश करू नये, यासाठी पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष आणि गावातील काही प्रतिष्ठित लोकांना एकत्र करून त्यांचे पथक तयार केले आहे. प्रत्येक दोन गावांमध्ये एक पोलीस कर्मचारी देखील सातत्याने पेट्रोलिंग करणार आहे. पोलीस पथकाच्या माध्यमातून घुसखोरांना आता रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवाय जिल्ह्यातील 14 नाकेबंदी करण्यात आलेल्या ठिकाणांवर देखील पोलिसांनी बंदोबस्त वाढला आहे. या ठिकाणी पोलिस जवान डोळ्यात तेल घालून घुसखोरांवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात खुसखोर पकडून त्यांना विविध निर्वासित शिबिरांमध्ये ठेवण्यात आले आहे.

पुण्यातून येणाऱ्यांची सर्वाधिक संख्या -
रोजगार किंवा शिक्षणानिमित्त परभणीतून लाखोजण मोठ्या शहरात गेले आहेत. त्यापैकी बहुतांश लोक लॉकडाऊन जाहीर होताच किंवा त्यापूर्वीच परभणी जिल्ह्यात परतले आहेत. मात्र विविध अडचणी निमित्त पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यात अडकून पडलेले नागरिक आता परभणीत परत येण्यासाठी धडपडत आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या पुणे येथून परभणीत येणाऱ्यांची आहे. पुण्यातून 322 लोकांनी गैरमार्गाने परभणीत प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद येथून 174, बीड 162, मुंबई येथून 50 तर उर्वरित लोक अन्य जिल्ह्यातून गैरमार्गाने दाखल झाले आहेत. या सर्वांना ताब्यात घेऊन होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आज बुधवारी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांकडून चेकपोस्टची पाहणी -
आज बुधवारी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी स्वतः शहरातील विविध भागांमध्ये जाऊन लोकांची होत असलेल्या गर्दीच्या ठिकाणी भेट दिली. सोशल डिस्टन्सिंग उडणारा फज्जा लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना उपाययोजनांच्या बाबत सूचना दिल्या. शिवाय जिल्ह्यातील सर्व सीमा बंद असून सुद्धा चोर तथा गैरमार्गाने येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी तयार केलेल्या पाथरी तसेच जिंतूरकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील चेक पोस्टची पाहणी करून कडक सूचना दिल्या.

रेल्वे पटरीने येणाऱ्या तरुणांना पकडले -
जालना जिल्ह्यातील सातोना-सेलू ही जिल्हाहद्द बंद केल्यामुळे अनेकजण रेल्वे रुळावरून परभणी जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच शेत मार्गाने, लहान गाडीवाटेने देखील मोटरसायकलवर येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशाच काही तरुणांवर आज सेलूचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी कारवाई करत त्यापैकी काहींना परत पाठवले, तर काहींना निर्वासित शिबिरांमध्ये ठेवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.