ETV Bharat / state

पोलिसांचे कडे तोडून पळणारी भरधाव जीप परभणी पोलिसांनी पाठलाग करून पकडली

author img

By

Published : Apr 23, 2020, 4:12 PM IST

Updated : Apr 23, 2020, 5:34 PM IST

नांदेड येथून आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास एक मोटारगाडी परभणी शहरात दाखल झाली होती. या गाडीतून आपल्या कुटुंबाला नांदेडकडे घेऊन जात असताना जिंतूर रोडवर पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्या ठिकाणी पोलिसांनी लावलेले कडे तोडून पुढे पळ काढला.

parbhani police caught escaped jeep
पोलिसांचे कडे तोडून पळणारी भरधाव जीप परभणी पोलिसांनी पाठलाग करून पकडली

परभणी - अडकलेले कुटुंब घेऊन भरधाव वेगाने जाणारी क्रुझर जीप परभणी पोलिसांनी पाठलाग करून पकडली आहे. विशेष म्हणजे या क्रुझरने जिंतूर रोडवर पोलिसांनी लावलेले कडे देखील तोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जवळपास पाच ते सहा किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी या मोटार गाडीला पकडले. त्यातील लोकांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

नांदेड येथून आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास एक मोटारगाडी परभणी शहरात दाखल झाली होती. या गाडीतून आपल्या कुटुंबाला नांदेडकडे घेऊन जात असताना जिंतूर रोडवर पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्या ठिकाणी पोलिसांनी लावलेले कडे तोडून पुढे पळ काढला. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ सहायक पोलीस अधीक्षक तथा शहर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांना कळविले. त्यांच्या निर्देशानुसार या गाडीचा पोलिसांनी पाठलाग केला. ही क्रुझर भरधाव वेगाने नांदेडच्या दिशेने धावत होती.

उड्डाणपूल, बस स्टॅन्ड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे ही क्रुझर जात असताना स्वतः बगाटे यांनी वसमत रोडवरील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गेटसमोर आपले वाहन आडवे लावत ही गाडी अडवली. त्यानंतर या गाडीतील सात जणांना ताब्यात घेऊन त्यांना रुग्णालयात पाठविले. यासंदर्भात नवामोंढा पोलिसांनी नोंद घेतली आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्याच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त असताना ही वाहने परभणीत दाखल होत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी सतर्कता बाळगत अधिक कडक बंदोबस्त लावला आहे.

Last Updated : Apr 23, 2020, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.