ETV Bharat / state

परभणीत कापूस पणन महासंघाच्या विरोधात जिनिंगधारकांचे आमरण उपोषण

author img

By

Published : Dec 10, 2020, 3:29 PM IST

जिनिंगधारकांनी परभणीतील जिल्हा कचेरीवर आजपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. कापूस पणन महासंघाने कापसाच्या नुकसान भरपाईची कोट्यवधी रुपयांची नोटीस देऊन पिळवणूक केल्याचा आरोप जिनिंग चालक असोसिएशनने केला आहे.

परभणी
परभणी

परभणी - जिल्ह्यातील जिनिंगधारकांनी अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतरही कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू ठेवली. तसेच कोरोनाच्या महामारीचा देखील धोका पत्करून कापूस खरेदी केली. मात्र, असे असताना कापूस पणन महासंघाने कापसाच्या नुकसान भरपाईची कोट्यवधी रुपयांची नोटीस देऊन पिळवणूक केल्याचा आरोप जिनिंग चालक असोसिएशनने केला आहे. याविरोधात जिनिंगधारकांनी परभणीतील जिल्हा कचेरीवर आजपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.

जिनिंग असोसिएशनच्या वतीने अमरण उपोषण सुरू

यासंदर्भात जिनिंग-प्रेसिंग असोसिएशनच्या वतीने यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रश्नावर न्याय देण्याची मागणी केली होती. परंतु, प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे जिनिंग असोसिएशनच्या वतीने हे अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

'कापसाचे नुकसान जिनिंग चालकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न'

शासनाने शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आम्ही कोरोनाची भिती बाजूला ठेवून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला. मात्र, कापूस पणन महासंघाचे हा माल उचलण्यास दिरंगाई केली. परिणामी कापसावर ताडपत्री झाकल्याने अंतर्गत उष्णतेमुळे कापसाचे नुकसान झाले, असे जिनिंग-प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश डागा म्हणाले. परंतु, हे नुकसान महासंघाकडून जिनिंग चालकांच्या माथी मारण्याचे काम सुरू आहे. हा जिनिंग चालकांवर अन्याय असून, याविरोधात शासनाने न्याय द्यावा, म्हणून आम्ही हे आमरण उपोषण करत असल्याचे ते म्हणाले. या आंदोलनात जिनिंग चालक दीपक अंबिलवादे, मुरलीधर डाके, प्रितेश भंडारी आदी जिनिंग चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

हेही वाचा - शेतकरी आंदोलन : शरद पवार, राहुल गांधींसह विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपतींना भेटणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.