ETV Bharat / state

'कोरोना' नियंत्रणात परभणी जिल्हा राज्यात दुसरा; सामूहिक यंत्रणांच्या प्रयत्नांचे फळ - corona control structure parbhani news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वात प्रथम परभणी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. त्याचाच परिणाम म्हणजे जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात केवळ 98 रुग्ण आढळले असून, त्यापैकी तब्बल 90 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर, केवळ तीन रुग्णांचा इतर गंभीर आजार असल्याने मृत्यू झालेला आहे. तसेच केवळ 5 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Jun 24, 2020, 7:02 PM IST

परभणी - एकीकडे राज्यात कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण देखील वाढले आहे. यात कोल्हापूर जिल्हा प्रथमस्थानी असून द्वितीय स्थान परभणी जिल्ह्याने पटकावले आहे. कोल्हापुरचा रिकव्हरी रेट 90.4 तर परभणीचा 87.1 टक्के एवढा आहे. त्यानुसार परभणी जिल्हा राज्यात द्वितीय तर मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे. या संदर्भात आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ.अर्चना पाटील (पुणे) यांनी राज्यातील कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे जिल्हावार प्रमाण नुकतेच जाहीर केले आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात राहण्यासाठी शासकीय, निमशासकीय आणि सर्वसामान्य नागरिकांचे सामूहिक प्रयत्न उपयोगात आले.

विशेष म्हणजे राज्यात सर्वात प्रथम परभणी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. जिल्ह्याच्या 12 सीमा आणि सीमावर्ती भागातील 83 गावांमध्ये जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होताच नाकाबंदी केली. मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांना जिल्ह्यात बंदी करण्यात आली होती. याचाच परिणाम म्हणजे जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात केवळ 98 रुग्ण आढळले असून, त्यापैकी तब्बल 90 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर, केवळ तीन रुग्णांचा इतर गंभीर आजार असल्याने मृत्यू झालेला आहे. तसेच केवळ 5 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत.

जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या नियंत्रणास महसुल प्रशासनासह जिल्हा शासकीय रुग्णालय, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा पोलीस यंत्रणा, आजी-माजी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, संघटनांचे प्रयत्न व मित्रमंडळांची सक्रियता आणि नागरिकांची सतर्कता कारणीभूत ठरली आहे. ज्यामुळे गेल्या तीन महिन्यात संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना परभणीत त्या प्रमाणात रुग्ण वाढले नाही. सुरुवातीपासूनच रुग्णसंख्येचे प्रमाण व त्यात दिवसांचा फरक हा मोठा राहिला आहे.

सुरुवातीपासूनच परभणी जिल्हा ग्रीनझोनमध्ये होता. दुसऱ्या टप्प्पाच्या अखेरीस पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. परंतु, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी लॉकडाऊनच्या बाबतीत सुरुवातीपासूनच कठोर भूमिका स्विकारल्या. शिवाय जिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे डॉ. प्रकाश डाके यांच्यासह डॉक्टर्स, अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अपर पोलीस अधीक्षक रागसुधा सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी संबंधित ठाण्यांचे निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, फौजदार तसेच अन्य कर्मचारीही कोरोना विरुध्दच्या लढाईत आजही कार्यरत आहेत.

या खेरीज जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश खंदारे व अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची विशेषतः अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणाची भुमिकाही लक्षणीय राहिली आहे. याप्रमाणेच महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग, अग्निशामक दल तसेच तालुका नगरपालिकांनी गेल्या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणावर समयसूचकता दाखवली आहे. ज्याचा परिणाम परभणी जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात राहिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.