ETV Bharat / state

रोहित्रांच्या तक्रारी सुटत नसतील तर ठेकेदारांना काळ्या यादीत टाका - पालकमंत्री मलिकांचे आदेश - परभणी लेटेस्ट न्युज

1 मे महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यानिमित्त पालकमंत्री नवाब मलिक परभणीत आले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अग्रणी बँकेने पुढाकार घेऊन खरीप पिककर्ज वाटपासंदर्भात जास्तीत जास्त ठिकाणी मेळावे घ्यावेत. वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमातून याची प्रसिद्धी करावी. जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत या योजनांचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

parbhani guardian minister nawab malik  नवाब मलिक परभणी दौरा  परभणी लेटेस्ट न्युज  शेतकऱ्यांबाबत नवाब मलिक
रोहित्रांच्या तक्रारी सुटत नसतील तर ठेकेदारांना काळ्या यादीत टाका - पालकमंत्री मलिकांचे आदेश
author img

By

Published : May 1, 2020, 11:57 AM IST

परभणी - खते, बियाणे शेतकर्‍यांना वेळेवर उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना देतानाच परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आज गुरुवारी सांयकाळी शेतकऱ्यांच्या रोहित्रांचे प्रश्न सुटत नसतील, तर संबंधित गुत्तेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. अल्पसंख्याक विकास तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलीक यांच्या उपस्थितीत गुरुवारी संध्याकाळी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

1 मे महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यानिमित्त पालकमंत्री नवाब मलिक परभणीत आले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीस खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, सुरेश वरपूडकर, मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, मनपा आयुक्त रमेश पवार व विभाग प्रमुख उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवून तसेच तोंडाला मास्क बांधून या बैठकीत सर्वांनी हजेरी लावली. यावेळी पालकमंत्री नवाब मलिक यांनी खरीप हंंगामामध्ये शेतकर्‍यांच्या मागणीनुसार खते व बियाणांचा पुरवठा करण्यात यावा. बियाणे व खतांचा तुटवडा होणार नाही, याची सर्वांनी दखल घ्यावी. अनुदानावर वाटप करण्यात येणार्‍या बियाणांचा शेतकरी व लाभार्थ्यांना कसा लाभ होईल, याची काळजी घ्यावी, असे सांगितले.

अग्रणी बँकेने पुढाकार घेऊन खरीप पिककर्ज वाटपासंदर्भात जास्तीत जास्त ठिकाणी मेळावे घ्यावेत. वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमातून याची प्रसिद्धी करावी. जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत या योजनांचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. यावेळी खासदार जाधव व आमदार डॉ. पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर तसेच कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात आपले प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर पालकमंत्र्यांनी महावितरणच्या तक्रारीबाबत गांभीर्याने दखल घेत शेतकर्‍यांचे रोहित्र जळण्याचे मोठे प्रमाण आहे. संबंधीत ठेकेदार वेळेवर काम करीत नसतील तर शेतकर्‍यांना अडचणीस सामोरे जावे लागेल. यामुळे संबंधीत ठेकेदार कामात कसूर करीत असतील, तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, महावितरणचे अभियंता जायभाये आदींची देखील उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.