ETV Bharat / state

परभणीत आढळले विक्रमी रुग्ण; 713 कोरोनाबधितांची भर, 10 जणांचा मृत्यू - परभणी कोरोना न्यूज

जिल्ह्यात आज गुरुवारी 713 कोरोनाबधितांची भर पडली असून, 10 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील विविध कोरोना रुग्णालयांमध्ये तब्बल 3 हजार 786 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत 482 करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

परभणी जिल्हा रुग्णालय
परभणी जिल्हा रुग्णालय
author img

By

Published : Apr 8, 2021, 10:52 PM IST

परभणी - जिल्ह्यात आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक अर्थात विक्रमी कोरोना बाधित रुग्ण आज (गुरुवारी) आढळून आले आहेत. आज 713 कोरोनाबधितांची भर पडली असून, 10 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, या ठिकाणच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक परभणीत दाखल झाले आहे. हे पथक उद्या (शुक्रवारी) जिल्ह्यातील विविध कोरोना रुग्णालयांना भेटी देणार देऊन व्यवस्थेची पाहणी करणार आहे.

3 हजार 786 बाधितांवर उपचार सुरू

सध्या परिस्थितीत जिल्ह्यातील विविध कोरोना रुग्णालयांमध्ये तब्बल 3 हजार 786 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत 482 करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत 18 हजार 659 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून, त्यापैकी 14 हजार 391 जण करोनामुक्त झाले आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 90 हजार 581 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 71 हजार 336 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले तर 18 हजार 511 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 594 अनिर्णायक आणि 140 नमुने नाकारण्यात आले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

गुरुवारी आढळले विक्रमी रुग्ण

विशेष म्हणजे आज गुरुवार (8 एप्रिल) हा दिवस जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या संदर्भातील सर्वाधिक रुग्ण आढळून आलेला दिवस ठरला आहे. आजपर्यंत कधीही एका दिवसात एवढे कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले नव्हते. आज गुरुवारी तब्बल 713 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग हा आता प्रचंड वेगाने वाढत असून, नागरिकांना यापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे आणि गर्दीत जाणे टाळावे लागणार आहे. शिवाय प्रशासनाकडून देखील उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करणे आवश्यक झाले आहे.

केंद्राचे विशेष पथक देणार कोविड सेंटरला भेटी

जिल्ह्यातील कोविड-19 चा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक आज (गुरुवार) दुपारी परभणीत दाखल झाले असून, त्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासोबत प्राथमिक चर्चा करून माहिती घेतली. या पथकात नागपूर येथील येथील डिपार्टमेंट ऑफ कंम्युनिटी मेडिसिन ऑल इंडियाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. रंजन सोलंकी, पॉंडिचेरीच्या मेडिसिन जेआयपीएमआरचे असिस्टंट प्रोफेसर डॉ.दिनेश बाबू एस. यांचा समावेश आहे. दरम्यान, आज जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीस सीईओ सदानंद टाकसाळे, अतिरिक्त सीईओ यादव, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, लसीकरण जिल्हा समन्वयक अधिकारी, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर उपस्थित होते.

दरम्यान, या दोन अधिकार्‍यांच्या पाहणी दौर्‍याचे नियोजन करण्यात आले असून, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे आणि शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांंच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परभणी शहर आणि परभणी ग्रामीण भागात पुढील दोन दिवस हे पथक पाहणी करणार आहे. उद्या (शुक्रवारी) परभणी शहरातील सर्व कोविड सेंटरला तसेच लसीकरण केंद्रांना ते भेटी देणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस हे पथक संपूर्ण परभणी जिल्ह्यातील कोरोना व्यवस्थेचा आढावा घेऊन काही उपयोजना सुचवणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.