ETV Bharat / state

परभणीत 'बर्ड फ्लू'; कोंबड्या व अन्य पक्षी नष्ट करण्याचे आदेश

author img

By

Published : Jan 11, 2021, 6:51 AM IST

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे 4 दिवसांपूर्वी 800 कोंबड्यांचा दोन दिवसांच्या दरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण 'बर्ड-फ्लू'च असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Bird Flu
बर्ड फ्लू

परभणी - जिल्ह्यातील मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्डफ्लूमुळेच झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला काल (रविवारी) रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तत्काळ या परिसरातील कोंबड्यांसह इतर सर्व पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. दहा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला असून, या ठिकाणच्या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

मुरुंबा गावात 8 हजार कोंबड्या; सर्व पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश -

मुरुंबा या गावात आठ पोल्ट्री फार्म असून त्यामध्ये आठ हजार कोंबड्या आहेत. चार दिवसांपूर्वी सलग दोन दिवसात 800 कोंबड्यांच्या अचानक मृत्यू झाला. याशिवाय गावातील अन्य पक्षांचे देखील मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. तसेच परभणी शहरातील नारायण चाळ परिसरात देखील तीन कोंबड्या अज्ञात आजाराने मरण पावल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे तात्काळ पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टरांनी मुरुंबा गावात तळ ठोकून गावातील सर्व पक्षांचे त्यांनी नमुने घेऊन पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. या अहवालात कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लूच (तांत्रीक नाव-H5N1) असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आता या गाव परिसरातील सर्व व कोंबड्या आणि पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्व गावकऱ्यांची होणार तपासणी -

कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता हा आजार गावकऱ्यांच्या माध्यमातून पसरू नये म्हणून तत्काळ मुरुंबा आणि परिसरातील दहा किलोमीटरच्या गावात राहणाऱ्या ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले आहेत.

कुपट्यातही कोंबड्यांचा मृत्यू -

मुरुंबा आणि परभणी शहरातील घटनेनंतर पुन्हा काल (रविवारी) संध्याकाळी उशिरा सेलू तालुक्यातील कुपटा या गावात देखील कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. याची देखील जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून, कुपटा हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले. गावातील मृत कोंबड्यांचे नमुने घेण्यात आले असून ते पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून या गावातील नागरिकांच्या देखील तपासणी करण्याचे आदेश बजावले आहेत.

स्थलांतरित पक्ष्यांमुळे आजार येत असल्याची शक्यता -

सध्या हिवाळ्याचे दिवस असून मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षी स्थलांतरित होत असतात. याप्रमाणेच परभणी जिल्ह्यातील दुधना प्रकल्प आणि येलदरी प्रकल्पावर देखील मोठ्या प्रमाणात परदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. सेलू तालुक्यातील कुपटा या ठिकाणाहून दुधना प्रकल्प जवळ असल्याने कदाचित स्थलांतरित पक्षांच्या माध्यमातून हा आजार या ठिकाणच्या पक्षांमध्ये आला असावा, अशी शक्यता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य भागात देखील कोंबड्यांचा किंवा इतर पक्षांचा मृत्यू होत असल्यास त्यांनी तात्काळ प्रशासनाला कळवण्याचे आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा, प्रदर्शन आणि सर्व पशु पक्षांच्या अवागमनावर बंदी -

बर्ड-फ्लू च्या पार्श्वभूमीवर परभणी तालुक्यातील मुरुंबा आणि सेलू तालुक्यातील कुपटा या गावात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार गाव परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले असून, गावातील 10 किलोमीटर परिसरात कुकूट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा, प्रदर्शन तसेच पशुपक्ष्यांच्या अवागमनास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. तर मुरूंबा व कुपटा गावात सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले. त्याठिकाणी पशूसंवर्धन विभागाचे पथक तळ ठोकून आहे. तसेच या दोनही गावातील नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्यातची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.