ETV Bharat / state

परभणीतील सखी मतदान केंद्र चिखलात, मतदारांची कसरत

सखी मतदान केंद्र फुगे आणि फुलांनी सजविण्यात आले आहे. आकर्षक रांगोळ्या काढून मतदान केंद्राची शोभा वाढविण्यात आली. तसेच येणाऱ्या प्रत्येक मतदाराला पुष्पगुच्छ देण्यात येत आहे. मात्र, ही सर्व सजावट आणि स्वागत यावर पावसामुळे पाणी फेरले आहे.

परभणीतील सखी मतदान केंद्र चिखलात
author img

By

Published : Oct 21, 2019, 5:12 PM IST

परभणी - मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून मतदारांना आकर्षित करण्यात येत आहे. यासाठी सखी आणि आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे हेच सखी मतदान केंद्र अक्षरशः पाणी आणि चिखलाच्या दलदलीत रुतले आहे. त्यामुळे फुले आणि फुग्यांनी सजवलेल्या या केंद्रात प्रत्येक मतदाराला कसरत करत वाट काढावी लागत आहे.

परभणीतील सखी मतदान केंद्र चिखलात, मतदारांची कसरत

परभणी जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 1 सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या मतदान केंद्रावर सर्व कर्मचारी तसेच अधिकारी महिला असून बंदोबस्तासाठी देखील महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र, परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या एकता नगरातील गांधी विद्यालय या शाळेच्या मतदान केंद्रावर संपूर्ण महिलाराज असलेले सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून परभणीत परतीचा पाऊस सुरू आहे. या मतदान केंद्राच्या समोर मैदानावर प्रचंड पाणी साचले असून चिखल तयार झाले आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या मतदारांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. मतदानासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे पाहावयास मिळते.

Intro:परभणी - मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून मतदारांना आकर्षित करण्यात येत आहे. यासाठी सखी आणि आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे; परंतु परभणीचे हेच सखी मतदान केंद्र अक्षरशः पाणी आणि चिखलाच्या दलदलीत रुतले आहे, असेच म्हणावे लागेल. फुलं आणि फुग्यांनी सजवलेल्या या केंद्रात प्रत्येक मतदाराला कसरत करत वाट काढावी लागत आहे.

Body:परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 1 सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या मतदान केंद्रावर सर्व कर्मचारी तसेच अधिकारी महिला असून बंदोबस्तासाठी देखील महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. परंतु परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या एकता नगरातील गांधी विद्यालय या शाळेच्या मतदान केंद्रावर संपूर्ण महिलाराज असलेले सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून परभणीत होत असलेल्या परतीच्या पावसामुळे या मतदान केंद्राच्या पुढील मैदानावर प्रचंड पाणी साचले असून, चिखल तयार झाला आहे. ज्यामुळे याठिकाणी येणाऱ्या मतदारांना या चिखलातून वाट काढावी लागत आहे. मतदानासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे पहावयास मिळते.

"फुलांची सजावट फिक्की"

सदर सखी मतदान केंद्र फुगे आणि फुलांनी सजविण्यात आले आहे. आकर्षक रांगोळ्या काढून मतदान केंद्राची शोभा वाढविण्यात आली. तसेच येणाऱ्या प्रत्येक मतदाराला पुष्पगुच्छ देण्यात येत आहे. मात्र ही सर्व सजावट आणि स्वागत या चिखलाच्या असुविधांमुळे फिक्के पडले आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- wkt & sakhi vis

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.