ETV Bharat / state

जमीन हडपल्याच्या आरोपाला खासदार जाधव यांनी 'हे' दिले उत्तर - खासदार संजय जाधव यांची पत्रकार परिषद

परभणीपासून 20 किलोमीटरवर असलेल्या झिरो फाटा येथील मोक्याची सुमारे साडेतीन एकर जमीन परभणीचे खासदार संजय जाधव यांनी हडपल्याचा आरोप त्यांच्यावर संबंधित कुटुंबाने केला आहे. मात्र, खासदार जाधव यांनी सर्व आरोप फेटाळले आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 14, 2021, 7:19 PM IST

Updated : Jan 14, 2021, 7:37 PM IST

परभणी - येथून 20 किलोमीटरवर असलेल्या झिरो फाटा येथील मोक्याची सुमारे साडेतीन एकर जमीन परभणीचे खासदार संजय जाधव यांनी हडपल्याचा आरोप त्यांच्यावर संबंधित कुटुंबाने केला आहे. या आरोपाला उत्तर देण्यासाठी गुरुवारी (दि. 14 जाने.) खासदार संजय जाधव यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. आपण या व्यवहाराची नोंदणी केली असून, त्याचा मोबदला बँकेच्या माध्यमातून त्यांना पैसे दिले. मात्र, आरोप करणाऱ्यांनी त्या व्यक्तीलाच गायब केल्याचे ते म्हणाले. तसेच या प्रकरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी हे खतपाणी घालत असल्याचा आरोप देखील खासदार जाधव यांनी केला.

बोलताना खासदार जाधव व वर्षा काळे

यासंदर्भात परभणीच्या वसमत रोडवरील खासदार संजय जाधव यांच्या कार्यालयात त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, युवा जिल्हाधिकारी अर्जुन सामाले, पप्पू गायकवाड आदी उपस्थित होते.

काय आहे हे प्रकरण

खासदार संजय जाधव यांच्यावर जमीन हडपल्याचा जो आरोप झाला आहे. ती जमीन परभणी-वसमत रोडवरील झिरो फाटा या ठिकाणी मोक्‍याच्या जागेवर आहे. तिची सध्या बाजार भावात कोट्यवधी रुपये किंमत आहे. ही जमीन खासदार संजय जाधव यांनी रामप्रसाद बाबाराव काळे यांच्याकडून खरेदी केली. सुमारे 3 एकर 35 गुंठे ही जमीन असून, ती खासदार संजय जाधव यांनी त्यांची पत्नी क्रांती जाधव यांच्या नावाने 27 ऑक्टोबर, 2020 रोजी खरेदीखत करून घेतले आहे. मात्र, जमिनीचे मूळ मालक रामप्रसाद काळे यांच्या पत्नी प्रेमा काळे, दोन मुली आणि सून वर्षा यांनी 'ही जमीन खासदार जाधव यांनी रामप्रसाद काळे यांना धमकावून किंवा त्यांना भूलथापा देऊन त्यांच्याकडून खरेदी केल्याचा आरोप केला आहे. या व्यवहाराला त्यांची सहमती नसल्याचे त्यांचे म्हणणे असून, त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून या महिला या जमिनीवर वास्तव्याला आहेत. त्यांनी खासदार संजय जाधव यांच्या विरोधात जिल्हाधिकारी तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. तसेच या प्रकरणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवर जाऊन दाद मागणार असल्याचेही प्रेमा काळे यांनी म्हटले आहे. त्यानंतर हे प्रकरण जोरदार चर्चेत आले. त्यामुळे आज खासदार संजय जाधव यांनी या प्रकरणी आपला खुलासा माध्यमांपुढे मांडला आहे.

माझा व्यवहार पारदर्शी

हा व्यवहार आपण पारदर्शीपणे केला आहे. माझी पत्नी क्रांती जाधव यांच्या नावाने ही जमीन खरेदी केली असून, त्यांच्या बँके खात्यातून रामप्रसाद काळे यांच्या बँके खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. त्यामुळे यामध्ये कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. मात्र, ज्यांच्या नावाने पैसे दिले आहेत, त्यांना हे लोक पुढे येऊ देत नसल्याचे खासदार म्हणाले.

प्रकरणामागे रामप्रसाद काळे यांचे जावई

या प्रकरणामागे रामप्रसाद काळे यांचे अंबाजोगाई येथील जावई असल्याचा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे. हा व्यवहार झाल्यानंतर त्यांच्या जावयाने रामप्रसाद काळे यांना त्यांच्याकडे लपवून ठेवले आहे. त्यांना ते बाहेर येऊ देत नाहीत. रामप्रसाद काळे यांच्या खात्यावर दिलेले पैसे या लोकांनी वापरले. त्यांना हा व्यवहार नको होता, तर त्यांनी ते पैसे खात्यावर जमा करून घ्यायचेच नव्हते. त्यामुळे आपण कुठलाही गैरव्यवहार केला नाही आणि जर यात काही चूक असेल तर राजकारणात पुन्हा कोणाला तोंड दाखवणार नाही, असे देखील खासदार जाधव यावेळी म्हणाले.

प्रकरणाला राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांचे खत-पाणी

दरम्यान, या प्रकरणामागे रामप्रसाद काळे यांचे जावई आहेत. त्याप्रमाणेच परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी हे या प्रकरणात खतपाणी घालत आहेत. त्यांनी यासंदर्भात चौकशीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. पण, आपण काहीही लपवत नाहीत. या प्रकरणात सदर महिलेने नार्को टेस्टची मागणी केली आहे. ही मागणी आपण देखील करत आहोत. मात्र, 'पैसे घेतले की नाही, व्यवहार केला की नाही', यासंदर्भात रामप्रसाद काळे यांचीही नार्को टेस्ट करावी, अशी मागणी देखील खासदार जाधव यांनी यावेळी केली.

कार्यकर्त्याच्या लेकरांच्या पोटावर पाय देऊन पुढे जाणे, बरोबर आहे का - वर्षा काळे

दरम्यान या जमिनीचे मालक रामप्रसाद काळे यांचा दिवंगत मुलगा स्वप्नील काळे हा खासदार संजय जाधव यांचा कट्टर कार्यकर्ता होता. यासंदर्भात बोलताना स्वप्नील काळे यांची पत्नी वर्षा म्हणाल्या की, 'खासदार जाधव यांनी कार्यकर्त्यांच्या लेकरांच्या पोटावर पाय देऊन पुढे जाणे बरोबर आहे का, तसेच 'खासदारांनी एवढा विचार करायला पाहिजे की, त्यांच्या जिवाला जीव देणारा, त्यांचा कट्टर कार्यकर्ता स्वप्नील याच्या माघारी त्यांची दोन मुले आहेत, बायको आहे, त्यांनी आमचा विचार करायला पाहिजे होता. ते स्वतःला वारकरी म्हणवून घेतात, वारकरी म्हणजे प्रेम आणि जिव्हाळा असतो. मात्र, त्यांनी अशी कृती केल्याबद्दल वर्षा काळे यांनी संताप व्यक्त केला. तसेच शासनाने आम्हाला या प्रकरणी न्याय द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

हेही वाचा - कोरोना लसीचे 9 हजार 330 डोस परभणीत दाखल

Last Updated : Jan 14, 2021, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.