ETV Bharat / state

आमदार बोर्डीकरांकडून सीएसची पाठराखण, म्हणाल्या.. त्यांच्याही अडचणी पाहणे गरजेचे

author img

By

Published : Apr 4, 2021, 6:59 PM IST

Updated : Apr 5, 2021, 10:59 PM IST

जिल्हा रुग्णालयात शनिवारी ऑक्सिजन आणि उपचाराअभावी 2 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ घातला होता. त्यानंतर खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. यानंतर आज भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी जिल्हा रुग्णालय आणि कोरोना रुग्णालयाला भेट दिली.

MLA Bordikar Visit Parbhani District Hospital
परभणी जिल्हा रुग्णालय आमदार बोर्डीकर भेट

परभणी - जिल्हा रुग्णालयात शनिवारी ऑक्सिजन आणि उपचाराअभावी 2 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ घातला होता. त्यानंतर खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. यानंतर आज भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी जिल्हा रुग्णालय आणि कोरोना रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची पाठराखण केली. लोकप्रतिनिधी म्हणून आपणही त्यांच्या अडचणी पाहणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

प्रतिक्रिया देताना आमदार मेघना बोर्डीकर

हेही वाचा - जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या असमन्वयाचा नागरिकांना फटका; खासदार संजय जाधवांचा आरोप

परभणीच्या जिल्हा रुग्णालयात शनिवारी झालेल्या गोंधळानंतर आज भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुद्धा जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन कोरोनाबाधितांसाठीच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रकाश डाके, निवासी वैद्यकीय अधिकारी सुरवसे, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते. यावेळी आमदार मेघना बोर्डीकर यांनी रुग्णांसोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी प्रयत्न करत आहेत

आमदार बोर्डीकर यांनी जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेला नाव ठेवण्याऐवजी त्या ठिकाणी काय कमी आहे, हे देखील पाहणे गरजेचे असल्याचे म्हणाल्या. तसेच, येणाऱ्या काळात परिस्थिती बिघडल्यास जिल्हा रुग्णालय सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय जिल्हा शल्य चिकित्सक आणि त्यांचे सर्व सहकारी जिल्हाभरातून येणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांच्या सोयी-सुविधांसाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना ज्या काही सोयी सुविधा हव्यात आणि ज्या काही अडचणी येत आहेत, त्या देखील आपण पाहायला पाहिजे. आपल्याकडे फिजिशियनची कमतरता आहे. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी फिजिशियना सेवा देण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे, येणाऱ्या काळात हा प्रश्न आणि अडचण दूर होईल. शिवाय ऑक्सिजनच्या कमतरतेबाबत देखील चर्चा करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

वाईट परिस्थितीला तोंड देण्यास जिल्हा रुग्णालय सज्ज

दरम्यान, मे महिन्यापर्यंत कोरोनाची परिस्थिती वाईट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, तशी परिस्थिती आली तरी जिल्हा रुग्णालय त्या परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज असल्याचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले. मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या अडीअडचणी पाहणे हे देखील आपले कर्तव्य आहे. शिवाय नागरिकांनी देखील कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळावेत. कोरोनाची चाचणी केल्यास अहवाल येईपर्यंत इतरांमध्ये मिसळू नये, स्वतःला विलगीकरणात ठेवावे, असे आवाहन देखील शेवटी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केले.

भोंगळ कारभाराबद्दल खासदार, जिल्हाधिकाऱ्यांनी झापले

परभणीच्या जिल्हा रुग्णालयातील सारी वॉर्डात शनिवारी पहाटे एका 65 वर्षीय रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला, तर अन्य एका रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्हा रुग्णालयात लागलीच बैठक घेऊन जिल्हा शल्यचिकित्सकांसह तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांना चांगलेच झापले होते. तसेच, जिल्हा रुग्णालयाच्या एकूणच भोंगळ कारभाराचा त्यांनी एकप्रकारे 'पंचनामा' च केला. तसेच, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य उपसंचालकांशी चर्चा करून नाराजी व्यक्त केली, तर खासदारांनी हे प्रकरण थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहचवल्याचे सांगितले.

हेही वाचा - परभणीत ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू; हलगर्जी करणारे अधिकारी फैलावर

Last Updated : Apr 5, 2021, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.