परभणी - युतीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांनी आघाडीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा परभणीत ४२ हजार ३९९ मतांनी विजय संपादन केला आहे. संजय जाधव समर्थकांनी विजयानंतर एकच जल्लोष केला आहे.
Live updates -
- ७.३५ - संजय जाधव ४२ हजार ३९९ मतांनी विजयी
- ६.३० - युतीचे विद्यमान शिवसेनेचे संजय जाधव विजयी घोषित
- १.५३ - संजय जाधव - २५४७५ आघाडीवर
- १२.१७ - संजय जाधव २९०४६ मतांनी आघाडीवर
⦁ शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना ४१ हजार ९४८ मते
⦁ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांना ३१ हजार ९०९ मते
⦁ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना ९ हजार ५१३ मते मिळाली आहेत.
⦁ शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यापेक्षा १० हजार २३९ मतांनी आघाडीवर आहेत.
- १०.५१ - तिसऱ्या फेरीअखेर संजय जाधव यांची १० हजार मतांनी आघाडी
- शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव हे ६२२५ मतांनी आघाडीवर
- थोड्याच वेळापूर्वी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव हे आघाडीवर आहे.
- आज सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
मतमोजणी ठिकाण
वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
२०१४ सालची परिस्थिती
२०१४ च्या निवडणुकीत सेना-भाजप युती आणि काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी यांच्यात थेट लढत झाली होती. २०१४ ला संजय जाधव विरूद्ध विजय भांबळे यांच्यात लढत झाली होती. यामध्ये संजय जाधव यांचा तब्बल १ लाख १७ हजार मतांनी विजय झाला होता.
मतदानाची टक्केवारी
येथील मतदानाची टक्केवारी 63.19 इतकी आहे. तर 2014 साली 64.44 इतकी मतदानाची आकडेवारी आहे.
जनतेच्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष
या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. पण लोकप्रतिनिधी सोयीस्करपणे या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात रस्ते, पाणी वीज हे प्रमुख प्रश्न आहेत. खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. बऱ्याच दिवसापासून असलेली वैद्यकिय महाविद्यालयाची मागणी अद्यापही पूर्ण झाली नाही. तसेच दुधणा प्रकल्प अपूर्ण आहे. तसेच परभणी शहरासाठी असणारी पाणी योजना गेल्या १५ वर्षापासून रखडली आहे.