ETV Bharat / state

परभणी : टाळेबंदीचा 'असा'ही फायदा; टँकरलॉबीचे सुटले ग्रहण

author img

By

Published : May 24, 2020, 11:07 AM IST

शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून आठ दिवसांनी पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे जिल्ह्याला लागलेले टँकरलॉबीचे ग्रहण यावेळी सुटले, असेच म्हणावे लागेल. काही तालुक्यांमधील किरकोळ पाणीटंचाई लक्षात घेता, ग्रामीण भागातील 20 विहिरी मात्र प्रशासनाकडून अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

संग्रहित -  टँकरने पाणीपुरवठा
संग्रहित - टँकरने पाणीपुरवठा

परभणी - टाळेबंदीमुळे बहुतांश व्यवसाय आणि वाहतूक बंद असल्याने शहर व जिल्ह्यात पाण्याचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे दरवर्षी जिल्ह्यात निर्माण होणारी पाणीटंचाई गायब आहे. त्यामुळे जिल्ह्यात व शहरात एकाही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही.

जिल्ह्यात साधारणपणे मार्च महिन्यात पाणीटंचाईचे नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागते. हे नियोजन करत असतानाच मार्च महिन्यात कोरोनामुळे टाळेबंदीची परिस्थिती ओढावली. परिणामी सर्व व्यवहार बंद झाले. प्रामुख्याने पाण्याचा वापर हॉटेल व्यवसाय तसेच वाहतुकीदरम्यान एसटी आणि रेल्वे स्टँडवर होत असतो. मात्र या वर्षी या पाण्याचा वापरच बंद झाला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पाण्याचा फटका हा परभणी शहर तसेच जिंतूर आणि गंगाखेड तालुक्यात अधिक सहन करावा लागतो. परभणी तर 20 ते 22 दिवसांना एकदा नळाला पाणी येत असते. मात्र गेल्या काही दिवसात नवीन पाणीपुरवठा योजनेची बहुतांश कामे झाल्याने आठ दिवसाला पाणीपुरवठा होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर यावर्षीच्या उन्हाळ्यात महानगरपालिका हद्दीतील प्रभागांना टंचाईची झळ सोसावी लागली नाही. प्रशासनासाही आतापर्यंत पाणीपुरवठ्याकरिता एक टँकर द्यावा लागला नाही.

गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक उन्हाळयात परभणीवासीयांनी उष्णतेच्या लाटेबरोबर पाणी टंचाईच्या भयावह झळा सोसल्या. दर 15 ते 20 दिवसांआड होणारा पाणीपुरवठा, विशेषतः मध्यरात्री किंवा पहाटे तसेच हंडाभर पाण्यासाठी श्रमिकांची कुटुंबीयांसह भटकंती हे विदारक चित्र प्रत्येकाने अनुभवले आहे.

टँकरलॉबीचे सुटले ग्रहण

पाणी असूनही होती कृत्रिम पाणीटंचाई-

जिल्ह्यातील नेतृत्वास, महानगरपालिकेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांना या टंचाईविषयी कधीच गांभीर्य वाटले नाही. सत्तारूढ पक्षाच्या मंडळींनी टंचाईबाबत कधी अवाक्षर काढले नाही. विशेष म्हणजे विरोधकांनी फारशी त्याविषयी आक्रमक भूमिका घेतली नाही. अनेक वर्षात पुरेसा पाऊस होवूनही परभणीकरांना कृत्रिम टंचाई सहन करावी लागली. यास महानगरपालिकेची उदासनिता आणि पाणीपुरवठा विभागातील कोलमडलेली यंत्रणा कारणीभुत ठरली. अशा या पार्श्‍वभूमीवर उन्हाळ्याच्या तोंडावरच येलदरीतून सुधारीत पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आले. ते पाणी धर्मापुरीतील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहचले. तेथून ते पाणी शहरात नव्याने बांधलेल्या 8 टाक्यापर्यंत पोहचविण्यात आले. त्यामुळे या उन्हाळ्यात परभणीकरांना काही नवीन व बहुतांशी जुन्या वाहिन्यांतून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यातच आठ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करीत महापालिकेने सुखद धक्का दिला. त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा टंचाईअभावी सुसह्य ठरला.

टँकरलॉबीचे सुटले ग्रहण

गेल्या काही वर्षापासून टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतंर्गत टँकर लॉबीने मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले होते. विशेषतः काही सदस्यांनी या लॉबीच्या माध्यमातून स्वतःचे उखळ पांढरे केले. मनपाच्या जलकुंभातून अरेरावी करत पाणी भरून विक्रीचा उद्योग काहींनी सुरू केला होता. काहींनी स्वतःचे टँकर महापालिकेस भाड्याने लावून त्यातून उत्पन्न मिळवले. परंतू काही सदस्यांनी स्वतः टँकर खरेदी करीत आपल्या प्रभागातील नागरिकांची तहान भागविण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र, यावर्षी या उन्हाळ्यात एक टँकरसुध्दा चालू नाही. महानगरपालिकेचे दरवर्षी टँकरच्या माध्यमातून होणारे सुमारे दीड कोटी रुपये वाचले आहेत. जे नागरिक परस्पर पाणी खरेदी करत होते, त्यांचेही पैसे वाचले आहेत. एकूणच परभणी शहर तसेच जिल्ह्यात यावर्षी पाण्यावर होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची बचत झाली आहे.

केवळ 20 विहिरींचे अधिग्रहण

जिल्ह्यातील काही गावे, वस्त्या, वाडे तसेच तांड्यावर पाणीटंचाई नेहमी जाणवते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, त्या त्या भागातील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये पूर्णा तालुक्यातील तीन तर गंगाखेड तालुक्यातील आठ आणि सेलू तालुक्यातील दोन तसेच जिंतूर तालुक्‍यातील सात विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. एकूण 20 विहिरी जिल्ह्यात सद्यपरिस्थितीत अधिग्रहित करण्यात आल्या आहे. सर्वत्र मुबलक पाण्याचा पुरवठा होत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.