ETV Bharat / state

गर्दी करणे भोवले... गंगाखेडसह तीन किमीच्या परिसरात पुन्हा संचारबंदी - परभणी बातमी

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता गंगाखेड शहरात नऊ दिवसांची टाळेबंदी करण्यात आली होती. टाळेबंदीत शिथिलता येताच नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली. यामुळे कोरोनाचा मोठा प्रचार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारपर्यंत पुन्हा टाळेबंदी घोषित केली आहे.

gangakhed
gangakhed
author img

By

Published : Jul 21, 2020, 8:13 PM IST

परभणी - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यातील गंगाखेड शहर आणि तीन किलोमीटरच्या परिसरात मंगळवारी (दि. 21 जुलै) सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 26 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे. गंगाखेड शहरात मागच्या महिन्यात पार पडलेल्या एका शाही विवाह स्वागत सोहळ्यानंतर या ठिकाणच्या कोरोना बाधित यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यात काल एक दिवसांची सुट्टी देताच बाजारात नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

गंगाखेड शहरात 28 जूनला पार पडलेल्या एका उद्योजकाच्या मुलाचा शाही विवाह स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानंंतर कोरोनाचा फैलाव वाढला आहे. जवळपास 100 हून अधिक रुग्ण यामुळे बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, त्या पार्श्वभूमीवर यापूर्वी सलग 9 दिवसांची संचारबंदी लावण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी (दि. 20 जुलै) बाजारपेठ उघडली. मात्र, याचा गैरफायदा घेत गंगाखेडच्या बाजारात हजारो नागरिकांची झुंबड उडाली. आजही तीच परिस्थिती होती. त्यामुळे गंगाखेडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. अनेकदा सूचना करून देखील लोक काळजी घेत नाहीत. कुठल्याही प्रकारच्या सोशल डिस्टन्सिंगचा पालन होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर परत आज जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज सायंकाळी 5 वाजेपासून ते रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. या संदर्भात आज सायंकाळी 5 वाजून 12 मिनिटांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आदेश जारी करण्यात आले. या काळात अत्यावश्यक सेवे शिवाय कोणीही बाहेर पडू नये. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, या संचारबंदीत अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, औषधे आणि इतर काही सेवांना सूट देण्यात आली आहे. ज्यामध्ये विविध शासकीय कार्यालय, सेवाभावी संस्था आणि आरोग्य संदर्भातील सेवा देणाऱ्यांना मात्र या संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालय व त्यांची वाहने, शासकीय व खासगी दवाखाने, वैद्यकीय दुकान, वैद्यकीय कर्मचारी व आपत्तकालीन सेवा, शासकीय निवारागृह व अन्न वाटप करणारे स्वयंसेवी संस्था व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेली वाहने व व्यक्ती, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया यांचे संपादक, प्रतिनिधी, वितरक, पेट्रोलपंप व गॅस वितरक, कर्मचारी व वाहने तर राष्ट्रीय बँका केवळ रास्तभाव दुकानदारांकडून चालनद्वारे रोकड भरणा तसेच ग्रामीण भागातील बँकेसाठी रोकड घेवून जाणारी वाहने व दुध विक्रेत्यांना सकाळी 6 ते 9 या वेळात संचारबंदीच्या काळात मुभा देण्यात आली आहे. याशिवाय कृषी दुकाने गोदामे आणि त्यासंदर्भातील वाहनांना देखील मुभा देण्यात आली असून, याशिवाय ई महा सेवा केंद्रांना पीक विमा भरणा करून घेण्यासाठी दुकाने उघडी ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.