ETV Bharat / state

परभणीत 10 व्यापाऱ्यांना लॉकडाऊनचे उल्लंघन भोवले; 1 लाख 35 हजारांचा दंड वसूल - businessman disobey rule parbhani

वारंवार सांगून देखील शहरातील अनेक आस्थापनाधारक लॉकडाऊनमध्ये लपूनछपून व्यवसाय करत आहेत. आज अशा 10 व्यापाऱ्यांना रंगेहात पकडून पोलीस आणि मनपा प्रशासनाच्या संयुक्त पथकाने तब्बल 1 लाख 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. या आस्थापनांमध्ये रेडिमेड कपडा व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

garment trader fined Parbhani
लॉकडाऊन उल्लंघन परभणी
author img

By

Published : May 31, 2021, 9:53 PM IST

परभणी - वारंवार सांगून देखील शहरातील अनेक आस्थापनाधारक लॉकडाऊनमध्ये लपूनछपून व्यवसाय करत आहेत. आज अशा 10 व्यापाऱ्यांना रंगेहात पकडून पोलीस आणि मनपा प्रशासनाच्या संयुक्त पथकाने तब्बल 1 लाख 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. या आस्थापनांमध्ये रेडिमेड कपडा व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा - परभणीत लॉकडाऊनमध्ये किराणा आणि भाजीपाला दुकानांना दिलासा

शहरात आज लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या 10 दुकानांकडून 1 लाख 35 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात 9 कापड दुकाने आहेत. शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही अनेक खासगी आस्थापना, दुकाने सुरू राहत असल्याने परभणी शहर महापालिकेने पोलिसांच्या मदतीने कारवाई सुरू केली आहे. ज्या दुकानांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन होत आहे अशांना दंड लावण्यात येत आहे.

...या दुकानदारांकडून वसूल केला दंड

दंड वसूल करण्यात आलेल्या दुकानदारांमध्ये इमेज मेन्स वेअरला 25 हजार रुपयांचा दंड लावला. तर, लालपोतू कलेक्शन 25 हजार, वैशाली साडी सेंटर 25 हजार, लाइफ मेन्स वेअर 10 हजार, क्लासिक मेन्स वेअर 10 हजार, आरेफ मेन्स वेअर 10 हजार, जीवनी मेन्स वेअर 10 हजार, बुशरा बैंगल्स 10 हजार, पत्तेवार दुकान 5 हजार, अब्दुल कापड दुकान 5 हजार, अशा 10 दुकांनावर कार्यवाही करत 1 लाख 35 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या पथकाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, नानलपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे व स.पो.नि तिप्पलवाड यांच्यासोबत संयुक्त कारवाई करत आज कच्छी बाजार, जनता मार्केट, शिवाजी चौक, स्टेशनरोड या परिसरात आस्थापना चालू ठेवल्याबद्दल दुकानदारांना हा दंड लावला. या कारवाईत सहाय्यक आयुक्त अलकेश देशमुख, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, प्रकाश काकडे, मोहन वाघमारे आदींसह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

हेही वाचा - पीकविम्याच्या जबाबदारीतून केंद्र सरकारने हात झटकले - दादा भुसे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.