ETV Bharat / state

परभणी एसपींच्या विशेष पथकाची धडक कारवाई; 27 लाखांचा अवैद्य गुटखा, रेती, दारू जप्त - परभणी एसपींच्या विशेष पथकाची कारवाई

गेल्या महिनाभरापासून परभणीतील अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर असून, कारवायांचा धडाका सुरू झाला आहे. लाखो रुपयांच्या गुटख्यासह अवैद्य मार्गाने वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत.

परभणी
परभणी
author img

By

Published : Nov 13, 2020, 8:55 PM IST

परभणी - येथे काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. गेल्या 24 तासात या पथकाने अवैद्य गुटखा, दारू आणि वाळूची चोरटी वाहतूक करणारे टिप्पर पकडून सुमारे 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये अनेक गुटखा आणि वाळूमाफियांना अटक करण्यात आली आहे. या धडक कारवायांमुळे जिल्ह्यातील अवैद्य व्यवसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

गेल्या महिनाभरापासून परभणीतील अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर असून कारवायांचा धडाका सुरू झाला आहे. लाखो रुपयांच्या गुटख्यासह अवैद्य मार्गाने वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत.

जिल्ह्यातील ठाण्यांच्या हद्दीत जाऊन विशेष पथकाची कारवाई

पोलीस अधीक्षक मीना यांनी विशेष पथकाची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. ज्यामुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यांनाकडे दुर्लक्ष करत असल्याचे यावरून सिद्ध होत आहे. दरम्यान, विशेष पथकाने गेल्या 24 तासात तब्बल 27 लाख रुपयांचा अवैद्य मुद्देमाल जप्त करत आरोपींना अटक केली आहे. यामध्ये परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेती वाहतूक करणारा अवैद्य ट्रक पकडून दोन आरोपींना अटक केली आहे.

प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी सुपारीचा साठा पकडला

यात रेतीसह 11 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय देशी दारूची अवैद्य मार्गाने वाहतूक करणार्‍या तीन आरोपींना पकडून त्यांच्याकडून प्रत्येकी 29 हजार 992 आणि 31 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, अंमलदार केंद्रे, भुजबळ, अझहर पटेल, दीपक मोदीराज, वाघमारे, गायकवाड यांनी केले. याशिवाय आज (शुक्रवारी) सकाळी पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, सुग्रीव केंद्रे, भुजबल, चिंचाणे यांच्या पथकाने गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे येथून नांदेडकडे जाणारी जीप पकडून त्यातील सुमारे 3 लाख 4 हजार 420 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी सुपारीचा साठा पकडला. या प्रकरणात जीप चालक शिवराम दिगंबर नीरस (रा. पेडगाव) याला अटक करून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय मध्यरात्री मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठाळा येथे नदीपात्रातून अवैद्य रेतीचा उपसा करून चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टरदेखील या पथकाने पकडून 12 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास मानवत पोलीस करत आहेत.

पोलिसांवर देखील कारवाई

पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी रूजू झाल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत पोलिस प्रशासनाला चांगलेच सक्रिय केले आहे. केवळ अवैध धंद्यांवर कारवाई न करता पोलीस दलातील भ्रष्ट आणि गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात गंगाखेड, पाथरी, जिंतूर आदी ठिकाणच्या अर्धा डझनहून अधिक दोषी आढळलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर बडतर्फी आणि निलंबनाची कारवाई केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.