ETV Bharat / state

हिंदु-मुस्लीम जोडप्याचा विवाह; जयंतीनिमित्त शिवरायांना पाथरीत अनोखा मुजरा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने पाथरीत झालेल्या एका सामूहिक विवाह सोहळ्यात हिंदू-मुस्लीम आंतरधर्मीय विवाह पार पडला.

आंतरधर्मीय विवाह केलेले जोडपे
author img

By

Published : Feb 19, 2019, 9:17 PM IST

परभणी - मुघल आणि निझाम राजवटीविरोधात लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या संस्थानातील मुस्लिमांशी कधीच दुजाभाव केला नाही. त्यांच्या कारभारात मुस्लिमांचा बरोबरीने सहभाग होता. अशा थोर महापुरुषाच्या जयंतीचे औचित्य साधून पाथरीत झालेल्या एका सामूहिक विवाह सोहळ्यात हिंदू-मुस्लीम आंतरधर्मीय विवाह पार पडला. हा विवाह म्हणजे एक प्रकारे महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजराच असल्याची भावना व्यक्त होत आहे.

पाथरी येथील ओंकार सेवाभावी संस्था, पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पाथरी-मानवत राष्ट्रीय महामार्गालगत शिवजन्मोत्सवानिमित्त विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात अपंग असलेला हिंदू मुलगा आणि मुस्लीम मुलीचे लग्न लावण्यात आले. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्याकाळी मंदिरासोबत मशीद बांधून जो एकतेचा संदेश देत होते, त्या इतिहासाची यानिमित्ताने एकप्रकारे पुनरावृत्ती झाली आहे.

डॉ. जगदिश शिंदे यांच्या पुढाकारातून शिवजयंतीचे औचित्य साधून पाथरी शहरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. यात १८ हिंदू, २ बौद्ध आणि ७ मुस्लीम विवाह लावण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त देशमुख होते. आमदार राहूल पाटील, माजी आमदार हरिभाऊ लहाने, मेघना बोर्डीकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दादासाहेब टेंगसे, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त सदाशिव थोरात आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

undefined
परभणीत पार पडला आंतरधर्मीय विवाह सोहळा

दरम्यान, या आंतरधर्मीय विवाहाची चर्चा या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात होत होती. धर्माच्या, जातीच्या चौकटी तोडत या दोन्ही कुटूंबांनी हा निर्णय घेतला. अशा पद्धतीने विवाह पार पडल्याने उपस्थितांनी या दोन्ही कुटुंबांचे कौतूक केले. मान्यवरांनी या नवदांम्पत्यांना आशिर्वाद दिले. शिस्त आणि नियोजनबद्ध पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.

Intro:परभणी - मुघल आणि निझाम राजवटी विरोधात लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या संस्थानातील मुस्लिमांशी कधीच दुजाभाव केला नाही. त्याच्या कारभारात मुस्लिमांचा बरोबरीने सहभाग होता. अशा थोर महापुरुषाच्या जयंतीचे औचित्य साधून पाथरीत झालेल्या एका सामूहिक विवाह सोहळ्यात हिंदू-मुस्लिम आंतरजातीय विवाह पार पडला. हा विवाह म्हणजे एक प्रकारे महाराजांना जयंतीनिमित्त मनाचा मुजराच असल्याची भावना व्यक्त होत आहे.Body:पाथरी येथील ओंकार सेवाभावी संस्था, पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पाथरी-मानवत राष्ट्रीय महामार्गालगत शिवजन्मोत्सवा निमित्त झालेल्या विवाह सोहळ्यात अपंग असलेल्या हिंदू मुलगा आणि मुस्लीम मुलीचे लग्न लावण्यात आला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्याकाळी मंदिरासोबत मजिद बांधून एकतेचा जो संदेश देत होते, त्या इतिहासाची या निमित्ताने एकप्रकारे पुनरावृत्ती झाली आहे. डॉ.जगदिश शिंदे यांच्या पुढाकारातून शिवजयंती चे औचित्य साधून पाथरी शहरात सर्वधर्मिय सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. यात अठरा हिंदू, दोन बौद्ध आणि सात मुस्लिम विवाह लावण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त देशमुख यांची उपस्थिती होती. तर आमदार राहूल पाटील, माजी आमदार हरिभाऊ लहाने, मेघना बोर्डीकर, जि.प.चे माजी सभापती दादासाहेब टेंगसे, शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त सदाशिव थोरात आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान, या आंतरजातीय विवाहाची चर्चा या सर्वधर्मिय विवाह सोहळ्यात होत होती. धर्माच्या, जातीच्या चौकटी तोडत या दोन्ही कुटूंबांनी हा निर्णय घेत विवाह पार पाडल्याने उपस्थितांनी या दोन्ही कुटूंबाचे कौतूक केले. मान्यवरांनी या नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद दिले. शिस्त आणि नियोजनबद्ध पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात पंचक्रोशीतील हजारो नागरीक उपस्थित होते.
-गिरीराज भगत, परभणी.
- सोबत 3 visuals आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.