ETV Bharat / state

Gutkha Mafia Raid : परभणीत मध्यरात्री गुटखा माफियांवर छापा ; 9 लाखांच्या गुटख्यासह 19 लाखाचा मुद्देमाल जप्त - 19 lakh worth gutkha seized

परभणीच्या दहशतवाद विरोधी पथकाने गुटखा माफियांवर मोठी कारवाई केली आहे. ज्यामध्ये छापा टाकून 9 लाखांच्या गुटख्यासह 19 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. त्याचबरोबर या प्रकरणी 2 आरोपींना अटक ( 2 accused arrested ) केली आहे.

gutkha seized
gutkha seized
author img

By

Published : Mar 17, 2022, 12:19 PM IST

परभणी - परभणीच्या दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाने ( Anti terrorism cell squad Action ) मुरुंबा ते धार रोडवर गुटखा माफियांवर मोठी कारवाई केली आहे. त्यांना एका कार मधून तब्बल 9 लाख रुपयांचा गुटखा काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी आणण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार परभणीच्या दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाने परभणी जवळील मुरुंबा ते धार रोडवर सापळा रचून ( Trap set Murumba to Dhar Road ) ही कार मध्यरात्री पकडून 2 आरोपींना अटक केली आहे. तसेच नांदेडच्या ज्या गुटखा माफियाकडून हा गुटखा आणण्यात आला होता, त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यरात्री लावला सापळा -

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाने ( Anti-terrorism cell squads ) काल बुधवार ते आज गुरुवारच्या मध्यरात्री, परभणी तालुक्यातील मुरुंबा ते धार रोड या रस्त्यावरील धार फाटा या ठिकाणी सापळा लावला होता. त्यानुसार काळ्या रंगाच्या एका बलेनो कार मधून हा गुटखा त्या ठिकाणी आला. पोलिसांनी तात्काळ या कारवर छापा मारून हा गुटखा ताब्यात घेतला. तसेच कार मधील माणिक बापुराव कदम (वय 32 वर्षे रा.पूर्णा) आणि आनंदा उद्धवराव ढोणे (वय 25 वर्ष रा. पांगरा ता. पूर्णा) या दोघांना अटक केली.

19 लाखांचा मुद्देमाल जप्त -

या प्रकरणी परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी कक्षाचे पोलीस हवालदार भारत नलावडे यांच्या फिर्यादीवरून कलम 188, 271, 272, 328, 34 भा.द.वी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात आरएमडी, राजनिवास जर्दा व पानमसाला, गोवा, गुटखा मसाला आणि वजिर या कंपन्यांचा तब्बल 9 लाख 65 हजार 480 रुपयांचा गुटखा जप्त ( Gutkha confiscated ) करण्यात आला. तसेच 1 बलेनो कार ज्याची किंमत 9 लाख असून, 30 हजार रुपयांचे मोबाइल असा एकूण 18 लाख 95 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नांदेडच्या गुटखामाफियावरही गुन्हा दाखल -

दरम्यान, या प्रकरणात नांदेड येथील ज्या गुटखा माफियांकडून हा गुटखा परभणीत विक्रीसाठी आणण्यात आला होता, त्या गुटखा माफियाचे नाव मतीन बेग (रा. खडगपुरा, नांदेड) असून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात ( Action against gutka mafias ) आला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक जयंत मिना यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विश्वास खोले, अमंलदार सुनील राठोड, रामकिशन काळे, अरुण कांबळे, अझर पटेल, सय्यद जाकेर, भारत नलावडे आदींनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.