ETV Bharat / state

परभणी: कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा मिटिंग हॉल आगीत भस्मसात; मालमत्तेचे मोठे नुकसान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा मिटिंगहॉल आज (शनिवारी) लागलेल्या आगीत भस्मसात झाला. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

fire
fire
author img

By

Published : Jan 23, 2021, 6:10 PM IST

Updated : Jan 23, 2021, 6:32 PM IST

परभणी - येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा मिटिंगहॉल आज (शनिवारी) लागलेल्या आगीत भस्मसात झाला. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी मिटींग हॉलचे छत आणि फर्निचर जळाल्याने सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या प्रकाराबद्दल कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांनी मात्र, व्यवस्थापनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसेच गुत्तेदारांना देखील चांगलेच फौलावर घेतले.

संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना घटनेबाबत जाब विचारताना कुलगुरू डॉ.अशोक ढवण

कुलगुरू संतप्त; दिले फायर ऑडिटचे आदेश -

कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी धाव घेऊन पाहणी केली. मात्र यावेळी ते चांगलेच संतप्त झाले होते. त्यांनी व्यवस्थापनातील संबंधित अधिकाऱ्यांवर प्रचंड रोष व्यक्त केला. निकृष्ट काम केल्याबद्दल गुत्तेदारांना देखील फैलावर घेतले. कमिशन घेऊन कामे होत असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, असे म्हणत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा इशारा दिला. तसेच विद्यापीठात यापूर्वी देखील आग लागण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. मुळात आग लागतेच कशी ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी यापुढील काळात अशा दुर्घटना घडू नयेत, म्हणून विद्यापीठातील सर्वच कार्यालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

'एसी'चे शॉर्टसर्किट होऊन भडकली आग -

दरम्यान, आज सकाळी 11 वाजता कृषी विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीत जयंतीचा कार्यक्रम होता, आणि त्यासाठी सर्व कर्मचारी बाजूला असलेल्या एका दालनात गेले होते. तेवढ्याच वेळात ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. मिटिंग हॉलच्या छताला लावलेल्या वातानुकूलित यंत्रणेत (एसी) शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याचे बोलल्या जाते. यामध्ये छताला असलेल्या पीओपीला आग लागून संपूर्ण मिटींग हॉल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. सोबतच संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा जळून गेली आहे.

महत्वाची कागदपत्रे, दस्तऐवज सुरक्षित -

या घटनेत कुठलेही कागदपत्रे अथवा दस्तऐवज जळालेली नाहीत. मिटींग हॉल असल्याने याठिकाणी केवळ फर्निचर आणि वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रोजेक्टर आदी साहित्य ठेवण्यात आले होते. याच साहित्याला आग लागली असून, यामध्ये कुठलीही कागदपत्रे जर जळाली नसल्याची माहिती कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रवीण कापसे यांनी दिली आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणली -

दरम्यान, आग लागल्याचे समजताच अधिकाऱ्यांनी परभणी महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत सभागृहाचे पीओपीचे छत या आगीत संपूर्णतः जळून गेले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांसोबतच महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी देखील आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. ही आग वेळीच आटोक्यात आल्याने बाजूलाच असलेल्या कुलगुरूंच्या मुख्य दालनाची कुठलीही हानी झाली नाही. तसेच या मिटिंग हॉलच्या बाजूला इतर कर्मचाऱ्यांची दालने व कार्यालय असून, ती सुरक्षित असल्याचे सांगण्यात येते.

Last Updated : Jan 23, 2021, 6:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.