ETV Bharat / state

परभणीत बापलेकीचा विहिरीत बुडून मृत्यू, महालक्ष्मी पूजनाच्या दिवशीच घडली घटना - वैष्णवी नागनाथ बल्लोरे मृत्यू

पालम तालुक्यातील गणेशवाडी येथे बाप-लेकीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडकीस आली. नागनाथ साहेबराव बल्लोरे (वय ४० वर्ष) व वैष्णवी नागनाथ बल्लोरे (वय १४ वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

Parbhani
Parbhani
author img

By

Published : Sep 14, 2021, 7:57 AM IST

परभणी : पालम तालुक्यातील गणेशवाडी येथे रविवारी (१२ सप्टेंबर) शेतात बाप-लेकीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१३ सप्टेंबर) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडकीस आली. दरम्यान, या घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पालम तालुक्यातील गणेशवाडी येथील नागनाथ साहेबराव बल्लोरे (वय ४० वर्ष) व वैष्णवी नागनाथ बल्लोरे (वय १४ वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले होते शेतात -

पालम तालुक्यातील गणेशवाडी येथील नागनाथ साहेबराव बल्लोरे (वय ४० वर्ष) व वैष्णवी नागनाथ बल्लोरे (वय १४ वर्ष) हे दोघेजण रविवारी (१२ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये बांधलेल्या जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले होते. परंतु खूप वेळ झाल्यानंतरही ते घराकडे परतलेच नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी रविवारी शेतात जावून पाहणी केली. शेतातील विहिरीजवळ नागनाथ बल्लोरे यांची चप्पल व मोबाईल आढळून आला. त्यामुळे नातेवाईकांनी विहिरीत पाहणी केली. मात्र, विहिरीत पाणी अधिक असल्याने ते आढळून आले नाहीत. विहिरीतील पाणी विद्युत पंपाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. सोमवारी (13 सप्टेंबर) दुपारी एक वाजता नागनाथ बल्लोरे व वैष्णवी बल्लोरे या बापलेकीचा मृतदेह आढळून आला. नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हालवण्यात आले.

अकस्मात मृत्यूची नोंद -

रविवारी नातेवाईकांनी पालम पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे आणि फौजदार विनोद साने यांनी शेतामध्ये जाऊन पाहणी केली. मात्र, त्यांनाही ते आढळून आले नव्हते. त्यामुळे नातेवाईकांनी बापलेक गायब झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, आज या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार विनोद साने करत आहेत.

हेही वाचा - साकीनाका बलात्कार प्रकरण : आरोपीवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल; पीडितेच्या कुटुंबाला 20 लाखांची मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.