ETV Bharat / state

परभणीत पुन्हा अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांची चिंतेत वाढ - रब्बी पीक

परभणीत गुरुवारी सकाळच्या दरम्यान पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

parbhani
परभणीत पुन्हा अवकाळी पाऊस
author img

By

Published : Jan 2, 2020, 12:31 PM IST

परभणी - परभणी शहरात आज(गुरुवार) पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. सकाळी सातच्या सुमारास १५ मिनिटे हा पाऊस पडला. दरम्यान, जिल्ह्यात इतर भागात मात्र कुठेच पाऊस झाला नाही. परंतु, येणाऱ्या काळात पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने याचा फटका रब्बीच्या गहू, हरभरा, ज्वारी व इतर फळपिकांना बसू शकतो, म्हणून शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.

परभणीत यापूर्वी २६ आणि ३१ डिसेंबरला अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी तब्बल तासभर पडलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा आज सकाळी ७ वाजता शहरात पावसाने हजेरी लावली. यावेळी, केवळ १५ मिनिटे पाऊस पडल्यामुळे याचा धोका पिकांना बसला नाही. असे असले तरी मागच्या २ वेळेस पडलेल्या पावसामुळे शेतातील पिकांना काही प्रमाणात फटका बसला आहे. शिवाय येणाऱ्या काही दिवसात आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.

हेही वाचा - परभणीत पाण्याच्या कारखान्यावर छापा; 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान, परभणीत सकाळी पाऊस पडल्यानंतर काही काळ ढग दाटून आले होते. परंतु, त्यानंतर पावसाळी वातावरण मोकळे होऊन कडक ऊन पडले आहे.

हेही वाचा - 8 दिवसांपासून गाव अंधारात; त्यात रोहित्रही जळाले

Intro:परभणी - परभणी शहरात आज पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. सकाळी सातच्या सुमारास पंधरा मिनिटे हा पाऊस पडला. दरम्यान, जिल्ह्यात इतर भागात मात्र कुठेच पाऊस झाला नाही; परंतु येणाऱ्या काळात पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने याचा फटका रब्बीच्या गहू, हरभरा, ज्वारी व इतर फळपिकांना बसू शकतो, म्हणून शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.Body:परभणीत यापूर्वी 26 आणि 31 डिसेंबरला अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी तब्बल तासभर पडलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा आज सकाळी सात वाजता शहरात पावसाने हजेरी लावली. यावेळी मात्र केवळ पंधरा मिनिटे पाऊस पडला. याचा धोका पिकांना बसला नाही. असे असले तरी मागच्या दोन वेळेस पडलेल्या पावसामुळे मात्र शेतातील पिकांना काही प्रमाणात फटका बसला असून, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शिवाय येणाऱ्या काही दिवसात आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.
दरम्यान, परभणीत सकाळी पाऊस पडल्यानंतर काहीकाळ ढग दाटून आले होते; परंतु त्यानंतर पावसाळी वातावरण दुर झाले आणि कडक ऊन पडले आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_rain_02_jan_visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.