ETV Bharat / state

दहावी गणिताच्या प्रश्नपत्रिकेत चुका; बोर्डाने मागणी मान्य केली तर विद्यार्थ्यांना मिळणार 7 गुण - दहावी परीक्षा प्रश्नपत्रिका चुका

माजी मुख्याध्यापक एम. बी. जाधव यांनी दहावीच्या गणित (भाग-2) प्रश्नपत्रिकेतील चुका समोर आणल्या आहेत. त्यांनी तशी मागणी दहावीच्या बोर्डाला केली असून, ही मागणी मान्य झाली तर विद्यार्थांना 7 गुण मिळू शकणार आहेत. असे झाले तर विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बाब होईल.

ssc exam maharashtra
दहावी गणिताच्या प्रश्नपत्रिकेत चुका; बोर्डाने मागणी मान्य केली तर विद्यार्थ्यांना मिळणार 7 गुण
author img

By

Published : Mar 15, 2020, 8:46 PM IST

परभणी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीची परीक्षा सध्या घेतली जात आहे. शनिवारी दहावीच्या गणित (भाग-2) भूमिती या विषयाची परीक्षा झाली. मात्र, भूमितीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दोन चूका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे णित अध्यापक मंडळाचे सदस्य तथा माजी मुख्याध्यापक एम. बी. जाधव यांनी मंडळाकडे, सदोष प्रश्नांचे पूर्ण गुण देण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाली तर विद्यार्थांना 7 गुण मिळू शकणार असून, विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बाब ठरेल.

दहावी गणिताच्या प्रश्नपत्रिकेत चुका; बोर्डाने मागणी मान्य केली तर विद्यार्थ्यांना मिळणार 7 गुण

हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयासह इतर उद्याने बंद

माजी मुख्याध्यापक जाधव यांनी माध्यमिक बोर्डाला फॅक्सद्वारे ही माहिती दिली आहे. काल शनिवारी गणित (भाग-2) हा भूमितीचा पेपर होता. या पेपरमध्ये इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 3 (ब) मध्ये चौथ्या प्रश्नात 'पाय' (विशिष्ट गणितीय संख्या) बरोबर 3.14 ही किंमत दिली आहे. परंतू ही किंमत जर ठेवली तर नाण्यांच्यी संख्या अपुर्णांकात येते. त्यामुळे या ठिकाणी पायची किंमत 3.14 देण्याची आवश्यकता नव्हती. विद्यार्थी 22/7 ही किंमत ठेवून प्रश्न सोडवू शकले असते व उत्तर पुर्णांकात आले असते. तसेच प्रश्न क्रमांक 4 (क) मध्ये पायची किंमत 3.14 देणे आवश्यक होते, तेथे देण्यात आली नाही. त्यामुळे या दोन्ही प्रश्न सोडवतांना विद्यार्थ्यांचा वेळ तर गेलाच; परंतू सदोष प्रश्नामुळे विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. असे पत्र जाधव यांनी बोर्डाला पाठवले आहे.

तरी मंडळाने याबाबत आता विद्यार्थ्यांना ज्यांनी वरील दोन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना सरसगट सात गुण द्यावेत, अशी मागणी त्यांनी बोर्डाकडे केल्याची माहिती जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.