ETV Bharat / state

टायर फुटल्याने कार शेतातील विहिरीत पडली; गाडीतील डॉक्टरचा गुदमरून मृत्यू

डॉ. सय्यद मुजम्मील हे स्वतः ही कार चालवत होते. या संदर्भात प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गाडी भरधाव वेगाने परभणीकडे येत असताना गाडीचे टायर फुटले. यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे ही गाडी रस्त्याच्या बाजुला शेताच्या बांधावर असलेल्या 30 फूट खोल विहिरीत गाडी कोसळली.

author img

By

Published : Nov 21, 2020, 5:14 PM IST

Updated : Nov 21, 2020, 5:47 PM IST

parbhani accident
परभणी अपघात

परभणी - होंडा कंपनीच्या कारचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीत जाऊन कोसळली. विहिरीमध्ये काठोकाठ पाणी भरलेले असल्याने ही कार विहिरीत बुडाली. यात कारमध्ये अडकलेल्या डॉक्टरचा मृत्यू झाला. डॉ. सय्यद मुजम्मील असे मृत डॉक्टरांचे नाव आहे.

अपघाताची दृश्ये.

ही घटना आज (शनिवारी) दुपारी 12 वाजताच्या सुमारास परभणी-पाथरी रोडवरील पेडगाव शिवारात हॉटेल बगीचा जवळ घडली. ही कार (एमएच 01 बी.जी. 4886) औरंगाबाद येथून परभणीकडे येत होती.

हेही वाचा - गुजरातमध्ये कार आणि डंपरचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जळून मृत्यू

30 फूट खोल विहिरीत कार कोसळली

डॉ. सय्यद मुजम्मील हे स्वतः ही कार चालवत होते. या संदर्भात प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गाडी भरधाव वेगाने परभणीकडे येत असताना गाडीचे टायर फुटले. यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे ही गाडी रस्त्याच्या बाजुला शेताच्या बांधावर असलेल्या 30 फूट खोल विहिरीत गाडी कोसळली. नंतर नागरिकांनी ही कार ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला शक्य होत नव्हते. त्यामुळे क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली.

डॉ. सय्यद मुजमिल यांचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला. त्यांचे मेहुणे घटनास्थळी आल्यानंतर ओळख पटली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.

'पत्नीला घेण्यासाठी परभणीकडे येत होते'

डॉ.सय्यद मुजम्मील हे औरंगाबाद येथे वास्तव्यास होते. ते माहेरी आलेल्या पत्नीला नेण्यासाठी परभणीत येत होते. मात्र, वाटेतच त्यांचा अशा पध्दतीने अपघात झाला. अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तर काही काळ वाहतूकही खोळंबली होती.

Last Updated : Nov 21, 2020, 5:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.