परभणी - जिल्ह्यातील सर्व 51 महसूल मंडळांना अतिवृष्टीचा निकष लावावा, संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीची मदत सर्व शेतकर्यांना देण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात आमदार बोर्डीकरांसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
'महाराष्ट्र सरकार क्वारंटाइन झालय'
'महाराष्ट्रातील आघाडी सरकार हे क्वॉरंटाइन झाले आहे. घरात बसून काम करणाऱ्या या सरकारला जागे करण्यासाठी आज आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे. परभणी जिल्ह्यातील सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट मदत मिळणे आवश्यक आहे. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. मात्र, नुकसानाची नोंद करण्याचे राहून गेल्याने ते देखील या मदतीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली आहे.
'जिल्ह्यातील 15 मंडळांवर अन्याय'
गेल्या महिन्यात झालेला संततधार पाऊस आणि पुरामुळे सर्वच पीके शेतकर्यांच्या हातातून गेली आहेत. असे असताना केवळ अतिवृष्टी हा निकष लावून शासनाकडून परभणी जिल्ह्यातील 51 पैकी केवळ 36 महसूल मंडळांना मदत दिली जाणार आहे. यामुळे 15 मंडळातील हजारो नुकसानग्रस्त शेतकर्यांवर हा अन्याय आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अतिवृष्टीमुळे दिली जाणारी मदत ही सर्वच शेतकर्यांना सरसकट देण्यात यावी, जे शेतकरी विमा कंपणीकडे आपल्या नुकसानाची नोंद करू शकले नाहीत, त्यांचेही पंचनामे करण्यात यावेत व 2018-19 मधील कोरडा दुष्काळ न मिळालेल्या शेतकर्यांच्या खात्यावर हे अनुदान तात्काळ जमा करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
शेतकर्यांच्या प्रश्नांवर आमदार मेघना बोर्डीकरांचे बेमुदत उपोषण - मेघना बोर्डीकर उपोषण बातमी
सरसकट शेतकऱ्यांना मदत द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी आमदार मेघना बोर्डीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालायसमोर उपोषण सुरू केले आहे.