ETV Bharat / state

जालनेकरांच्या विरोधानंतरही अखेर निम्न-दुधनाचे पाणी परभणीकडे झेपावले - Rahul Patil

निम्न-दुधना प्रकल्पातील पाणी अखेर परभणीकरांना मिळाले आहे. यासाठी जालनेकरांचा मोठा विरोध झाला, तरी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याने हे पाणी आज सायंकाळी परभणीकडे झेपावले आहे.

सोडण्यात आलेले पाणी
author img

By

Published : Jun 1, 2019, 10:05 PM IST

परभणी - दुष्काळी परिस्थितीमुळे नितांत आवश्यक असलेल्या निम्न-दुधना प्रकल्पातील पाणी अखेर परभणीकरांना मिळाले आहे. यासाठी जालनेकरांचा मोठा विरोध झाला, तरी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याने हे पाणी आज सायंकाळी परभणीकडे झेपावले आहे. या पाण्यामुळे परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, पूर्णा आणि परभणी तालुक्यातील शेकडो गावांची तहान भागणार आहे.

सोडण्यात आलेले पाणी आणि ग्रामस्थ

परभणी जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडल्याने शेतकरी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मदार दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील प्रचंड पाणीटंचाई लक्षात घेऊन परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी लोअर-दुधना प्रकल्पातून परभणीसाठी पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार परभणीचे माजी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लोअर दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केला होता. त्यानुसार राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना पाणी सोडण्याचे आदेशही दिले होते. त्याप्रमाणे 15 मे रोजीच हे पाणी परभणीकडे झेपावणार होते. परंतु त्यापूर्वीच जालन्यातील आमदार तथा पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी प्रकल्पातून परभणीसाठी पाणी सोडण्यास विरोध केला. परतूर तालुक्याला पाणी कमी पडेल, असे कारण देत विभागीय आयुक्तांना पाणी न सोडण्याचे निवेदन देत आंदोलन केले. प्रकल्पावर जाऊन काही कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता.

लोअर दुधना प्रकल्पातून परभणीला केवळ 15 टीएमसी पाणी सोडायचे आहे. त्याला देखील जालनेकर विरोध करत असल्याने परभणीतील सामान्य नागरिक संताप व्यक्त करत होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वतः प्रकल्पाची पाहणी करून आढावा घेतला होता. त्यानंतर हे पाणी सोडण्याचा निर्णय झाला.

आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता निम्न-दुधना प्रकल्पातून दुधना नदीच्या पात्रात गोदावरी पाठबंधारे विभागाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाणी सोडले. सध्या प्रकल्पात 47 दलघमी इतका पाणीसाठा असून, त्यापैकी केवळ 15 दलघमी पाणी परभणी जिल्ह्यासाठी सोडण्यात आले. यावेळी जालना जिल्ह्यातील आंदोलकांनी विरोध केला. परंतु तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांचा विरोध चालला नाही. यावेळी आंदोलकांनी न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे सांगितले. तर दुसऱ्या बाजूला परभणी जिल्ह्यातील 100 ते 200 लोकांनी पाणी कसे सोडल्या जाते, हे पाहण्यासाठी गर्दी केली होती. एकूणच या पाण्यावरून परभणी आणि जालना जिल्ह्यात राजकारण पेटले होते. मात्र आता पाणी सोडल्यानंतर याला पूर्णविराम मिळाला आहे.

या पार्श्वभूमीवर निम्न दुधना नदीकाठच्या ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये, तसेच ज्या शेतकऱ्यांनी किंवा इतर व्यक्तीस निम्न-दुधना नदीच्या पात्रात पशुधन किंवा इतर साहित्य ठेवलेले असेल, ते तात्काळ काढून घ्यावे, निम्न दुधना नदीपात्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा उपसा विद्युत मोटारीद्वारे कोणीही करु नये, असे आवाहन परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले आहे.

Intro:परभणी : दुष्काळी परिस्थितीमुळे नितांत आवश्यक असलेल्या निम्न-दुधना प्रकल्पातील पाणी अखेर परभणीकरांना मिळाले आहे. यासाठी जालनेकरांचा मोठा विरोध झाला असला तरी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याने हे पाणी आज शनिवारी सायंकाळी परभणीकडे झेपावले आहे. या पाण्यामुळे परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, पूर्णा आणि परभणी तालुक्यातील शेकडो गावांची तहान भागणार आहे.Body:परभणी जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडल्याने शेतकरी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मदार दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील प्रचंड पाणीटंचाई लक्षात घेऊन परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी लोअर-दुधना प्रकल्पातून परभणीसाठी पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार परभणीचे माजी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लोअर दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केला होता. त्यानुसार राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना पाणी सोडण्याचे आदेशही दिले होते. त्याप्रमाणे 15 मे रोजीच हे पाणी परभणीकडे झेपावणार होते आहे. परंतु त्यापूर्वीच जालन्यातील आमदार तथा पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी प्रकल्पातून परभणीसाठी पाणी सोडण्यास विरोध केला. परतुर तालुक्याला पाणी कमी पडेल, असे कारण देत विभागीय आयुक्तांना पाणी न सोडण्याचे निवेदन देत आंदोलन केले. प्रकल्पावर जाऊन काही कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता.
परंतू, लोअर दुधना प्रकल्पातून परभणीला केवळ 15 टीएमसी पाणी सोडायचे आहे. त्याला देखील जालनेकर विरोध करत असल्याने परभणीतील सामान्य नागरिक संताप व्यक्त करत होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वतः प्रकल्पाची पाहणी करून आढावा घेतला होता. त्यानंतर हे पाणी सोडण्याचा निर्णय झाला.
त्यानुसार आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता निम्न-दुधना प्रकल्पातून दुधना नदीच्या पात्रात गोदावरी पाठबंधारे विभागाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाणी सोडले. सध्या प्रकल्पात 47 दलघमी इतका पाणी साठा असून, त्यापैकी केवळ 15 दलघमी पाणी परभणी जिल्ह्यासाठी
सोडण्यात आले. यावेळी जालना जिल्ह्यातील सुमारे पन्नासएक आंदोलकांनी विरोध केला. परंतू तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांचा विरोध चालला नाही. यावेळी आंदोलकांनी न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे सांगितले. तर दुसऱ्या बाजूला परभणी जिल्ह्यातील 100 ते 200 लोकांनी पाणी कसे सोडल्या जाते, हे पाहण्यासाठी गर्दी केली होती.
एकूणच या पाण्यावरून परभणी आणि जालना जिल्ह्यात राजकारण भेटले होते, मात्र आता पाणी सोडल्यानंतर याला पूर्णविराम मिळाला आहे.
या पार्श्वभूमीवर निम्न दुधना नदीकाठच्या ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये, तसेच ज्या शेतकऱ्यांनी किंवा इतर व्यक्तीस निम्न-दुधना नदीच्या पात्रात पशुधन किंवा इतर साहित्य ठेवलेले असेल ते तात्काळ काढुन घ्यावे. निम्न दुधना नदीपात्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा उपसा विद्युत मोटारीद्वारे कोणीही करु नये, असे आवाहन परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत dudhna vis 1 to 2Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.