ETV Bharat / state

पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी फरार, परभणीच्या पाथरीतील घटना - पाथरी पोलिस

चोरीच्या प्रकरणात अटक आसलेल्या आरोपीने चक्क पोलीस ठाण्याच्या गेटवरून उडी मारुन पोबारा केला. ही घटना गुरुवारी दुपारी पाथरी येथे घडली आहे.

पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी फरार
पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी फरार
author img

By

Published : Jan 3, 2020, 1:52 AM IST

परभणी - चोरीच्या प्रकरणात अटक आसलेल्या आरोपीने चक्क पोलीस ठाण्याच्या गेटवरून उडी मारुन पोबारा केला. ही घटना गुरुवारी दुपारी पाथरी येथे घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला.

पाथरी पोलिसांनी सुनील भिकाजी कांबळे (रा. महात्मा फुले नगर पाथरी) या आरोपीला बुधवारी एका चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. या आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार होते. परंतु,दुपारी आरोपीने लघुशंकेला जाण्याचा बहाणा केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या हातातील हातकडी काढून त्याला बाहेर जाऊ दिले. मात्र, याच संधीचा फायदा घेऊन त्याने पोलीस ठाण्याच्या गेटवरून उडी मारून पोबारा केला.

पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीवेळ पाठलाग केल्यानंतरही तो पोलिसांच्या हाती लागला नाही. यानंतर आता पाथरी पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी विविध पथके पाठवली आहेत.

Intro:परभणी - चोरीच्या प्रकरणात अटक आसलेल्या आरोपीने चक्क पोलीस ठाण्याच्या गेटवरून उडी मारुन पोबारा केले. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी पाथरी येथे घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो पोलिसांना चुकांडा देवून फरार झाला. Body:पाथरी पोलिसांनी सुनील भिकाजी कांबळे (रा. महात्मा फुले नगर पाथरी) या आरोपीला काल बुधवारी (1 जानेवारी) एका चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. या आरोपीला आज ( 2 जानेवारी) न्यायालयात हजर केले जाणार होते. परंतू दुपारी आरोपीने लघुशंकेला जाण्याचा बहाणा केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या हातातील हातकडी काढून त्याला बाहेर जाऊ दिले. मात्र याच संधीचा फायदा घेऊन त्याने पोलीस ठाण्याच्या गेट वरून उडी मारून पोबारा केला. तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीवेळ पाठलाग केल्यानंतरही तो पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांना चुकांडा देवून तो फरार झाला. पाथरी पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी विविध पथके पाठवली आहेत.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pathri_police_station_vis & photoConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.