ETV Bharat / state

परभणीत 500 खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार - पालकमंत्री नवाब मलिक

भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता, परभणी शहरात 500 खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. याशिवाय तालुकास्तरावर प्रत्येकी 50 खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येणार असून, एकूणच जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी सुमारे 1 हजार नवीन बेडची व्यवस्था येत्या आठ ते दहा दिवसांत होणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

author img

By

Published : Apr 22, 2021, 3:11 PM IST

Jumbo Covid Center Nawab Malik Information
जम्बो कोविड सेंटर नवाब मलिक माहिती

परभणी - राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे परभणीत देखील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता, परभणी शहरात 500 खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. याशिवाय तालुकास्तरावर प्रत्येकी 50 खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येणार असून, एकूणच जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी सुमारे 1 हजार नवीन बेडची व्यवस्था येत्या आठ ते दहा दिवसांत होणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

माहिती देताना पालकमंत्री नवाब मलिक

हेही वाचा - परभणीत 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढला; 25 एप्रिलपर्यंत सर्वकाही राहणार बंद

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नवाब मलिक हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सकाळी त्यांनी शासकीय रुग्णालय, आयटीआय कोरोना रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमधील कोरोना रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदी उपस्थित होते.

परभणीत एक हजार नव्या बेडची व्यवस्था

परभणीत एका दिवसात एक हजार आणि एकदा तर बाराशे रुग्ण आढळून आले. दररोज साधारणतः सहाशे रुग्ण सरासरी आढळून येत आहेत. त्यामुळे, कुठेतरी बेडची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक झाले आहे. सध्या शहरातील जिल्हा रुग्णालय, आयटीआय इमारत आणि जिल्हा परिषद या ठिकाणी एकूण 700 बेड उपलब्ध आहेत. त्याप्रमाणेच खासगी रुग्णालयामध्ये देखील सुमारे 700 बेड उपलब्ध आहेत. मात्र, भविष्यातील परिस्थिती पाहता परभणी शहरातील कल्याण मंडप येथे 500 खाटांचे नवीन जम्बो कोरोना रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या प्रमाणेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 50 खाटा असलेले कोरोना रुग्णालय देखील उभारण्यात येणार असून, एकूणच जिल्ह्यासाठी एक हजार नवीन बेडची व्यवस्था येत्या आठ ते दहा दिवसांत करण्यात येणार असल्याची माहिती मलिक यांनी दिली.

500 छोटे छोटे ऑक्सिजन युनिटची खरेदी करणार

ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून 500 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर जनरेशनचे दोन प्लांट आपण उभारले आहेत. याचबरोबर आठ तालुक्यांमध्ये मिनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार आहोत. या माध्यमातून देखील दररोज 300 जम्बो सिलेंडरची क्षमता निर्माण होणार आहे. एकूण जिल्ह्यात तेराशे जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती केली जाणार आहे. याचबरोबर 500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अर्थात छोटी युनिट खरेदी करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. तसेच, कर्नाटकमधील भिलारी नावाच्या जिल्ह्यातून आपल्याला दररोज 20 केएल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत असल्याचे देखील नवाब मलिक यांनी सांगितले.

परभणीला आजच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध होणार

जिल्ह्याला सात एजन्सीच्या माध्यमातून रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत असतो. आज राज्य शासनाच्या माध्यमातून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात या इंजेक्शनची कुठलीही अडचण राहणार नाही. मात्र, किती साठा उपलब्ध होणार आहे, याचा आकडा मी देत नाही. कारण तसे कळाल्यास प्रत्येक माणूस इंजेक्शन मागायला निघेल. परंतु, जी गरज आहे, तेवढे इंजेक्शन उपलब्ध होणार असून, येणाऱ्या काळात बेड, ऑक्सिजन आणि इंजेक्शन यापैकी कुठलीही कमतरता राहणार नसल्याची ग्वाही मलिक यांनी दिले.

हेही वाचा - परभणीत अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने ताब्यात; 32 लाखाचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.