ETV Bharat / state

परभणीत बेशिस्त वाहनचालकांकडून 90 लाखांचा दंड वसूल; वाहतूक विभागाची कारवाई - बेशिस्त वाहनचालकांकडून दंड वसूल परभणी

2019 या वर्षात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २२३ वाहनांविरुध्द खटले दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2018 मध्ये 56 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यावर्षी, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करत जवळपास दुपटीने दंड वसूल करण्यात आला आहे. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

traffic
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Dec 30, 2019, 7:48 PM IST

परभणी - शहर वाहतूक विभागातर्फे सरत्या वर्षात तब्बल ९० लाख १८ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 36 हजार 950 वाहनधारकांकडून वर्षभरात हा दंड वसूल करण्यात आला. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

परभणीत बेशिस्त वाहनचालकांकडून 90 लाखांचा दंड वसूल

2019 या वर्षात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २२३ वाहनांविरुध्द खटले दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2018 मध्ये 56 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यावर्षी, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करत जवळपास दुपटीने दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा - बुलडाण्यात बेशिस्त वाहन चालकांकडून 5 लाख 97 हजारांचा दंड वसूल

अरुंद रस्ते तसेच वाहन चालकांमधील गैरशिस्त यामुळे शहरातील वाहतुक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले होते. शहर वाहतूक शाखेने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध शाळा, कॉलेजमध्ये समुपदेशन बैठकादेखील घेतल्या होत्या. याशिवाय, शहरातून जनजागृती रॅलीचे आयोजनही करण्यात आले होते. ३१ डिसेंबरलाही शहरात वाहतूक पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Intro:
परभणी - येथील शहर वाहतुक शाखेमार्फत सरत्या वर्षात तब्बल ९० लाख १८ हजार २०० रुपये दंड वसुल करून शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे. दरम्यान, शहर वाहतुक शाखेमार्फत करण्यात येणारी कार्यवाही जनतेकडुन चुकीची समजली जाते; परंतु या कार्यवाही मागील सकारात्मक भुमीका समजुन घेणे अतिशय महत्वाचे असल्याची भावना वाहतूक शाखेचे प्रभारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी ई टीव्ही शी बोलताना व्यक्त केली.Body:परभणी पोलिसांनी 2019 या संपूर्ण वर्षात शहरात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३६ हजार ७२७ वाहनधारकांकडून तब्बल ८४ लाख ५३ हजार १०० रुपये दंड वसुल करण्यात आला. तसेच अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या २२३ वाहनांविरुध्द खटले दाखल करुन ४ लाख १२ हजार ८०० रुपये दंड वसुल करण्यात आला. याशिवाय दारु पिवुन वाहन चालविणाऱ्या १९२ वाहन चालकांविरुध्द कारवाई करुन १ लाख ५२ हजार ३०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. एकुण तब्बल ९० लाख १८ हजार २०० रुपये दंड वसुल करून शासनाच्या तिजोरीत जमा केला. विशेष म्हणजे गत वर्षी म्हणजे च 2018 मध्ये केवळ 56 लाख रुपयांचा दंड वसूल झाला होता. या वर्षी मात्र वाहतुक नियमानांची कडक अंमलबजावणी करत जवळपास दुपटीने दंड वसूल करण्यात आला असल्याचेही सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोदे यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी तसेच वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करता आली. मात्र अरुंद रस्ते तसेच वाहन चालकांमधील गैरशिस्त यामुळे शहरातील वाहतुक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले होते. परंतू शहर वाहतुक शाखेने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध शाळा, कॉलेजमध्ये समुपदेशन बैठक घेतल्या शहरातुन जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संशयास्पद, वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारे, नंबर प्लेट नसलेले तसेच फॅन्सी नंबर प्लेट, कागदपत्रे नसलेल्या वाहनांना थांबवून तपासणी करुन हा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, वाहनधारकांनी त्यांच्या वाहनामध्ये कोणताही बदल करु नये, वाहन चालविण्याचा परवान, वाहनाची सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी, वाहनांवर पुढे तसेच मागे नंबर प्लेट नियमाप्रमाणे बसवावी, लहान व अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देवु नये. विशेष म्हणजे वाहन चालविण्याचा परवाना हा डि.जी. लॉकर आणि एम परिवहन अॅपमध्ये ठेवून मोबाईलच्या माध्यमातून दाखवल्यास ते ग्राह्य आहे, असेही ते म्हणाले.
या शिवाय ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या आगमणावेळी दारु पिवुन वाहन चालविण्यात येऊ नये. दारु पिवुन वाहन चालवितांना मिळुण आल्यास वाहन चालकाविरुध्द ड्रंक अँड ड्राईव्ह चा खटला दाखल करण्यात येईल, असा इशारा देखील सरोदे यांनी दिला.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_trafic_pi_tiktok & trafic_vis
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.