ETV Bharat / state

परभणीतील 4 मतदारसंघात 81 उमेदवार वैध; प्रस्थापितांसमोर बंडोबांचे आव्हान - gangakhed constituency

जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या ४ मतदारसंघातून 81 उमेदवारांचे 109 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर, सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक विभागाने मुदत दिली आहे. त्यादिवशी वरील 81 पैकी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात, यावर परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

परभणी मतदारसंघ
author img

By

Published : Oct 6, 2019, 10:00 AM IST

परभणी - जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या ४ मतदारसंघातून 81 उमेदवारांचे 109 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. याठिकाणी महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांसह वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि काही अपक्षांमध्ये लढत होणार आहे. विशेष म्हणजे सेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांसमोर बंडखोरांनी आव्हान ठेवले आहे. मात्र, सोमवारी त्यातील कोणते उमेदवार माघार घेतात? यावर विधानसभेच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघासाठी 27 उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी ४ अर्ज बाद झाल्याने 17 उमेदवारांचे 23 अर्ज पात्र ठरले आहेत. याप्रमाणेच परभणी मतदारसंघातील 37 पैकी 3 अर्ज बाद झाल्याने 27 उमेदवारांचे 34 अर्ज वैध ठरले आहेत. तसेच गंगाखेड मतदारसंघातील 42 अर्जांपैकी 17 अर्ज बाद झाल्याने 23 उमेदवारांचे 35 अर्ज वैध ठरले आहेत. याशिवाय पाथरी मतदारसंघातील 19 अर्जांपैकी 2 अर्ज बाद झाल्याने 14 उमेदवारांचे 17 अर्ज वैध ठरले आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये 81 उमेदवारांचे 109 अर्ज वैध ठरले आहेत.

हेही वाचा - पाथरीचे आमदार मोहन फडांना शक्ती प्रदर्शन पडले भारी; व्यासपीठच कोसळले, कार्यकर्त्यांचा गोंधळ
दरम्यान, सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक विभागाने मुदत दिली आहे. त्यादिवशी वरील 81 पैकी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात, यावर परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाचे चित्र स्पष्ट होणार आहे. परभणी जिल्ह्यात शिवसेना, भाजप आणि मित्र पक्षांच्या युतीची काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सोबत लढत होत आहे. शिवाय या ठिकाणी वंचित व अपक्षांनी देखील आपले उमेदवार देऊन युती तसेच आघाडीसमोर आव्हान निर्माण केले आहे. या चारही पक्षांमध्ये होणाऱ्या लढतीत नेमकं कोण बाजी मारतं? हे निकालानंतर स्पष्ट होईल. तसेच महायुतीच्या उमेदवाराला गंगाखेड, जिंतूर आणि पाथरी या ३ ठिकाणी बंडखोरांचे कडवे आव्हान असणार आहे. तर, परभणीत आघाडीच्या उमेदवाराला बंडखोराशी झुंज द्यावी लागणार, असे चित्र आहे.

विधानसभा निहाय उमेदवार आणि त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे -
पाथरी मतदारसंघ -
मोहन फड (भाजप), सुरेश वरपुडकर (काँग्रेस), गौतम उजगरे (बहुजन समाज पार्टी) अजय सोळंके (आंबेडकर वादी रिपब्लिकन पार्टी), मोईज अन्सारी (बहुजन मुक्ती), विलास बाबर (वंचित बहुजन आघाडी), नारायण चव्हाण (अपक्ष), डॉ. जगदीश शिंदे (अपक्ष), जयराम विघ्ने (अपक्ष), प्रल्हाद पाटील (अपक्ष), मुजमिल आलम (अपक्ष), मुंजाजीराव कोल्हे (अपक्ष), राम शिंदे (अपक्ष) आणि डॉ. संजय कच्छवे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा - परभणीत मोहन फड 'रिपाइं'चे तर मेघना बोर्डीकर 'रासप'च्या उमेदवार; कमळ फुलणार नाही

परभणी मतदारसंघ -
डॉ. राहुल पाटील (शिवसेना), प्रतिभा मेश्राम (बहुजन समाज पार्टी), रविराज देशमुख (काँग्रेस), सचिन पाटील (मनसे), अली खान मोईन खान (एमआयएम), शिवलिंग बोधने (प्रहार), मोहम्मद गौस झैन (वंचित बहुजन आघाडी), विनोद भोसले (बहुजन मुक्ती पार्टी), शेख सलीम (बहुजन महा पार्टी) तर अपक्ष अख्तर खान एहसान खान, अॅड. अफजल बेग, अब्दुल जमीर, अब्दुल सत्तार, अरुण पवार, निहान कौसडीकर, गोविंद देशमुख, जाकिर अहमद खान, मोईज अन्सारी, विखार अहमद खान, शेख अली, शेख शकूर, सय्यद शाकेर, सुभाष अंभोरे, सुरेश नागरे, संगीता जगदाळे, शमीम खान आणि हेमंत साळवे.

जिंतूर मतदारसंघ - 'वंचित' कडून परभणी जिल्ह्यातील चारही उमेदवार जाहीर; नवख्यांना संधी देऊन दिला धक्का

मेघना साकोरे बोर्डीकर (भाजपा), विजय भांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), मनोहर वाकळे (वंचित बहुजन आघाडी), अंकुश राठोड (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया), राजेंद्र घनसावध (बसपा), बालाजी शिंदे (संभाजी ब्रिगेड), सयद दिलावर (समाजवादी पार्टी), महेंद्र काळे (आंबेडकर नॅशनल काँग्रेस), दिनकर गायकवाड (बहुजन महा पार्टी) तर अपक्ष राम पाटील, स. जावेद हाश्मी, रामप्रसाद कदम, राजेश भिसे, खंडेराव आघाव, देवानंद रत्ने, आवेश कुरेशी व ज्ञानदेव दाभाडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा - गंगाखेड मतदारसंघासाठी रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातूनच भरला उमेदवारी अर्ज

गंगाखेड मतदारसंघ -
डॉ. मधुसूदन केंद्रे (राष्ट्रवादी काँग्रेस), विशाल कदम (शिवसेना), विठ्ठल जवादे (मनसे), देवराव खंदारे (बसपा), करुणा कुंडगीर (वंचित बहुजन आघाडी), गजानन गिरी (बहुजन विकास आघाडी), रत्नाकर गुट्टे (रासप), सखाराम बोबडे (महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी) तसेच अपक्ष म्हणून अजहर मेहताब, अभय कुंडगीर, गजानन मरगीर, तुकाराम व्हावळे, त्र्यंबक मुरकुटे, बालाजी सगर, बाळासाहेब निरस, भरत घनदात, राजाभाऊ फड, धन्यकुमार शिवणकर, सविता संतोष मुरकुटे, संजय कदम, संजीव प्रधान, संतोष मुरकुटे आणि माजी आमदार सीताराम घनदाट उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Intro:परभणी - परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या चार विधानसभा मतदार संघातून 81 उमेदवारांचे 109 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. याठिकाणी महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांसह वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि काही अपक्षांमध्ये फाईट होणार आहे. विशेष म्हणजे सेना भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांसमोर बंडखोरांनी आव्हान ठेवले आहे. मात्र सोमवारी त्यातील कोणते उमेदवार माघार घेतात ? यावर विधानसभेच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.Body:परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभेसाठी 27 उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी छाननीअंती चार अर्ज बाद झाल्याने 17 उमेदवारांचे 23 अर्ज पात्र ठरले आहेत. याप्रमाणेच परभणी विधानसभेसाठी 37 पैकी 3 अर्ज बाद झाल्याने 27 उमेदवारांचे 34 अर्ज वैद्य ठरले आहेत. तसेच गंगाखेड मतदार संघातील 42 अर्जांपैकी 17 अर्ज बाद झाल्याने 23 उमेदवारांचे 35 अर्ज वैध ठरले आहेत. याशिवाय पाथरी मतदारसंघातील 19 अर्जांपैकी 2 अर्ज बाद झाल्याने 14 उमेदवारांचे 17 अर्ज वैध ठरले आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये 81 उमेदवारांचे 109 अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक विभागाने मुदत दिली आहे. त्यादिवशी वरील 81 पैकी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात, यावर परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाचा चे चित्र स्पष्ट होणार आहे.
परभणी जिल्ह्यात शिवसेना,भाजप आणि मित्र पक्षांच्या युतीची काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सोबत लढत होत आहे. शिवाय या ठिकाणी वंचित व अपक्षांनी देखील आपले उमेदवार देऊन युती तसेच आघाडी समोर आव्हान निर्माण केले आहे. या चारही पक्षांमध्ये होणाऱ्या लढतीत नेमकं कोण बाजी मारतं ? हे निकालानंतर स्पष्ट होईल.
तसेच महायुतीच्या उमेदवाराला गंगाखेड, जिंतूर आणि पाथरी या तीन ठिकाणी बंडखोरांचे कडवे आव्हान असणार आहे, तर परभणीत आघाडीच्या उमेदवाराला बंडखोराशी झुंज द्यावी लागणार, हे नक्की.

"विधानसभा निहाय उमेदवार व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे"

पाथरी विधानसभा :-
मोहन फड (भाजप), सुरेश वरपुडकर (काँग्रेस), गौतम उजगरे (बहुजन समाज पार्टी) अजय सोळंके (आंबेडकर वादी रिपब्लिकन पार्टी) मोईज अन्सारी (बहुजन मुक्ती) विलास बाबर (वंचित बहुजन आघाडी) नारायण चव्हाण (अपक्ष), डॉ. जगदीश शिंदे (अपक्ष) जयराम विघ्ने (अपक्ष) प्रल्हाद पाटील (अपक्ष) मुजमिल आलम (अपक्ष) मुंजाजीराव कोल्हे (अपक्ष) राम शिंदे (अपक्ष) आणि डॉ. संजय कच्छवे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

परभणी विधानसभा :-
डॉ. राहूल पाटील (शिवसेना), प्रतिभा मेश्राम (बहुजन समाज पार्टी), रविराज देशमुख (काँग्रेस), सचिन पाटील (मनसे), अली खान मोईन खान (एमआयएम), शिवलिंग बोधने (प्रहार), मोहम्मद गौस झैन (वंचित बहुजन आघाडी), विनोद भोसले (बहुजन मुक्ती पार्टी) शेख सलीम (बहुजन महा पार्टी) तर अपक्ष अख्तर खान एहसान खान, अड.अफजल बेग, अब्दुल जमीर, अब्दुल सत्तार, अरुण पवार, निहान कौसडीकर, गोविंद देशमुख, जाकिर अहमद खान, मोईज अन्सारी, विखार अहमद खान, शेख अली, शेख शकूर, सय्यद शाकेर, सुभाष अंभोरे, सुरेश नागरे, संगीता जगदाळे, शमीम खान आणि हेमंत साळवे.

जिंतूर विधानसभा :-
मेघना साकोरे बोर्डीकर (भाजपा), विजय भांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), मनोहर वाकळे (वंचित बहुजन आघाडी), अंकुश राठोड (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया), राजेंद्र घनसावध (बसपा), बालाजी शिंदे (संभाजी ब्रिगेड), सयद दिलावर (समाजवादी पार्टी), महेंद्र काळे (आंबेडकर नॅशनल काँग्रेस), दिनकर गायकवाड (बहुजन महा पार्टी) तर अपक्ष राम पाटील, स.जावेद हाश्मी, रामप्रसाद कदम, राजेश भिसे, खंडेराव आघाव, देवानंद रत्ने, आवेश कुरेशी व ज्ञानदेव दाभाडे.

गंगाखेड विधानसभा :-
डॉ. मधुसूदन केंद्रे (राष्ट्रवादी काँग्रेस), विशाल कदम (शिवसेना), विठ्ठल जवादे (मनसे), देवराव खंदारे (बसपा) करुणा कुंडगीर (वंचित बहुजन आघाडी), गजानन गिरी (बहुजन विकास आघाडी), रत्नाकर गुट्टे (रासप), सखाराम बोबडे (महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी) तसेच अपक्ष म्हणून अजहर मेहताब, अभय कुंडगीर, गजानन मरगीर, तुकाराम व्हावळे, त्र्यंबक मुरकुटे, बालाजी सगर, बाळासाहेब निरस, भरत घनदात, राजाभाऊ फड, धन्यकुमार शिवणकर, सविता संतोष मुरकुटे, संजय कदम, संजीव प्रधान, संतोष मुरकुटे आणि माजी आमदार सीताराम घनदाट.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- परभणी जिल्हा विधानसभा निहाय नकाशाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.