परभणी - जिल्ह्यात मागील 24 तासांत 71 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली आहे. तर तब्बल 267 संभाव्या रुग्ण दाखल झाले आहेत. तसेच परभणीतील एका व मानवत येथील 2, अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 1 हजार 193 वर पोहोचला असून, आतापर्यंत 54 जणांचा बळी गेला आहे.
मंगळवारी (11 ऑगस्ट) प्राप्त अहवालानुसार 71 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या असून यात परभणी शहरात तब्बल 45 कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आले आहेत. त्यामध्ये भोईगल्ली, खासगी रुग्णालय, काद्राबाद प्लॉट, सुभाष रोड, आंबेडकर नगर, वसमतरोड, सुयोग कॉलनी, नानलपेठ, गांधीपार्क, दत्तधाम परिसर, शास्त्रीनगर, अनुसया नगर, यशोधन नगर, अहिल्याबाई होळकर नगर, आचार्य नगर, गणेश नगर, वांगीरोड, साखला प्लॉट, आनंदनगर, समर्थनगर, सुपर मार्केट, लंगोट गल्ली व डीआरडी कॉलनी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर तालुक्यात रायपूर, नांदखेडा, टाकळी, रेणापूर व आसेगावात एकूण 8 रुग्ण, सेलू शहरात मारवाड गल्लीत 2, गंगाखेड शहरात वैताळगल्लीत एक, तालुक्यात इसादला एक, पाथरी शहरात ज्ञानेश्वर नगर, सेलू रोड एकूण दोन, पूर्णा शहरात साळुबाई गल्ली, सिध्दार्थनगर एकूण लिमल्यात एक, सोनपेठात शहरातील नगरेश्वर गल्लीत चार, मानवत शहरात गोलाईत नगरात एक व पालम शहरात एक, असे एकूण 45 पुरूष, 26 महिला एकूण 71 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
विशेष म्हणजे परभणी शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्तींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत असताना मंगळवारी 15 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात परभणी शहरातील नागसेन नगर 1 महिला तर आंबेडकर नगर 1 पुरूष, आर.आर.टॉवर परिसर 1 पुरूष, विद्यानगरातील 1 पुरूष, त्रिमुर्ती नगर, माळी गल्ली येथील प्रत्येकी 1 महिला, शिवराम नगर 1 पुरूष, पोलीस क्वॉर्टर 1 पुरूष, पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर 1 पुरूष, जिंतूर शहर 1 पुरूष, सेलू शहर 1 महिला, मानवत मेनरोड भागातील 1 पुरूष, पाथरीच्या फकराबाद मोहल्ला येथे 16 वर्षीय मुलगी, जैतापूर मोहल्ला 32 वर्षीय पुरूष असे एकूण 6 महिला, 9 पुरूष एकूण 15 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
दुर्दैवी म्हणजे 3 जणांचा मृत्यू झाला यामध्ये परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट येथील 72 वर्षीय पुरूष, मानवत येथील राठोड गल्लीतील 57 वर्षीय पुरूष आणि मेनरोड पोलीस ठाण्याजवळील 64 वर्षीय कोरोनबाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 हजार 193 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून, 486 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 54 बाधितांचा मृत्यू झाला असून, उर्वरीत 653
रुग्णांवर कोरोना संक्रमीत कक्षात उपचार सुरू आहेत.
या दरम्यान, संभाव्य रुग्णांची देखील संख्या वाढत आहे. मंगळवार 267 संभाव्य रुग्ण दाखल झाले असून, त्यांच्यासह आतापर्यंत एकूण 6 हजार 358 संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यातील संसर्गजन्य कक्षात 674 जण असून विलगीकरण केलेले 1 हजार 21 आहेत. तर यापूर्वी विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले 4 हजार 663 रुग्ण आहेत.