ETV Bharat / state

परभणीतील 'त्या' 23 पैकी एकालाही कोरोनाची लागण नाही - परभणी न्यूज

आतापर्यंत 23 जणांची तपासणी झाली आहे असून त्यातील एकही जण कोरोनाग्रस्त आढळलेला नाही. त्यामुळे परभणीकरांनी सध्यातरी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

parbhani
जिल्हाधिकारी डी.एम. मुगळीकर
author img

By

Published : Mar 17, 2020, 9:06 PM IST

परभणी - आतापर्यंत 23 जणांची तपासणी झाली आहे असून त्यातील एकही जण कोरोनाग्रस्त आढळलेला नाही. त्यामुळे परभणीकरांनी सध्यातरी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान, शाळा, महाविद्यालय, मंदिर, आठवडी बाजार बंद केल्यानंतर आता ऐन लग्नसराईत मंगलकार्यालये बंद करण्याचा निर्णय शासन स्तरावर झाला आहे. त्यामुळे परभणीतील मंगलकार्यालये बंद करण्याचे आदेश देणार आहोत, अशी माहिती जिल्हाधिकारी डी.एम. मुगळीकर यांनी आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

जिल्हाधिकारी डी.एम. मुगळीकर

कोरोना विषाणूच्या संदर्भात प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत. या बाबतीत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, मनपा आयुक्त रमेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची उपस्थिती होती.

यावेळी दिलेल्या माहितीप्रमाणे परभणी जिल्ह्यात यापूर्वी सर्व शाळा, महाविद्यालय, मॉल, चित्रपटगृह, व्यायामशाळा याआधीच बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय मंदिर, मस्जिद, चर्च आदी धार्मिक स्थळांवर नागरिकांनी गर्दी करू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच आंदोलने, मोर्चे, धरणे असे कुठलेही कार्यक्रम ठेवू नयेत आणि आठवडी बाजार बंद ठेवण्याचेदेखील आदेश पारित करण्यात आल्याचे मुगळीकर यांनी सांगितले. त्यानंतर आता जिल्ह्यातील मंगलकार्यालये बंद ठेवण्याबाबतचे आदेश आम्ही काढणार आहोत, असेही मुगळीकर यांनी सांगितले.

दहाही जणांचा अहवाल निगेटिव्ह

दरम्यान, परभणी जिल्ह्यातील 23 लोकांना आतापर्यंत तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी एकही जण कोरोनाग्रस्त आढळलेला नाही. 23 पैकी दहा जणांच्या स्वॅपचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, तर, अन्य दोन जणांचे रिपोर्टदेखील निगेटिव्ह येणार आहेत.

...तर अधिकाऱ्यांवर कारवाई

सध्या कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या स्तरावर आहे. त्यामुळे प्रशासन स्तरावर मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. अधिकाऱ्यांच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत. एखाद्या अधिकाऱ्याने मुख्यालय सोडल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. आरोग्य शासनाला सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

तलावात कोंबड्या फेकणाऱ्यावर गुन्हा दाखल

कोरोनाचा फटका सर्वाधिक चिकन व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे गंगाखेड येथे दोन ट्रॉली भरून कोंबड्या तलावात फेकून देण्यात आल्या होत्या. त्या संपूर्ण कोंबड्या काढून त्यांची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात आली आहे. त्यांची तपासणी झाली असून त्यांना कुठलाही आजार नव्हता. शिवाय पाण्याचीदेखील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून लवकरच आरोपीदेखील अटक होईल, असेही मुगळीकर यांनी सांगितले.

काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई

दरम्यान, मास्क आणि हँडसानेटाईझरचा काळाबाजार कोणी करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. या संदर्भात एक तक्रार आलेली आहे. त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी देखील करण्यात आली. त्याचा अहवाल मागविला असून, त्यावर कारवाई करणार होणार आहे. तसेच परभणीत सध्या एन-95 चे 500 मास्क उपलब्ध असून 20 ते 25 हजार साधे मास्क उपलब्ध असल्याचेही मुगळीकर यांनी शेवटी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.