ETV Bharat / state

परभणीवर धुक्याची चादर, 14 अंश सेल्सियस तापमानाची नोंद - परभणी जिल्हा बातमी

मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात आज परभणीचे किमान तापमान 14 अंश सेल्सियस इतके निचांकी नोंदवण्यात आले आहे. तर कमाल तापमान 30 अंश आहे. परभणी येथील रेल्वे स्टेशन परिसरात व महामार्गावर थंडीमुळे सकाळी 7 वाजता धुक्याची चादर पसरलेली दिसून येत होती.

परभणीवर धुक्याची चादर
author img

By

Published : Nov 21, 2019, 10:32 AM IST

परभणी - परतीचा पाऊस लांबल्याने परभणी जिल्ह्यातील थंडीने थोडीशी विश्रांती घेतली होती. मात्र, गेल्या 4 दिवसांपासून परभणीतील थंडी कासावगतीने वाढत आहे. आज (गुरुवारी) सकाळी तर संपूर्ण परभणी शहर धुक्याखाली झाकोळले होते. त्यामुळे बोचऱ्या थंडीची चाहूल लागली असून लोकांनी अडगळीला ठेवलेले स्वेटर, मफलर, पायमोजे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.

परभणीवर धुक्याची चादर

हेही वाचा - परभणीत प्लास्टिक बंदीनंतरही पाणी पाऊचचा धंदा जोरात; दोनशे पोती प्लास्टिक जप्त

मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात आज परभणीचे किमान तापमान 14 अंश सेल्सियस इतके निचांकी नोंदवण्यात आले आहे. तर कमाल तापमान 30 अंश आहे.
परभणी येथील रेल्वे स्टेशन परिसरात व महामार्गावर थंडीमुळे सकाळी 7 वाजता धुक्याची चादर पसरलेली दिसून येत होती. तसेच या थंडीचा फटका पहाटे दूध, पेपर, भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. ते उशिराने आपल्या कामांना सुरूवात करत आहेत.

हेही वाचा - परभणी जिल्हा परिषदेत होणार 'महाशिवआघाडी'चा प्रयोग?

महत्त्वाचे म्हणजे या थंडीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. सर्दी, खोकला, तापीचे रूग्ण वाढत आहेत. सर्व रूग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. विशेषतः डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये अधिक वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने सर्वत्र डासांची निर्मिती झाली होती. त्यामुळे डेंगू सदृश्य आजार आणि तापीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शहरात धूर फवारणी व आरोग्य जनजागृती केली जात आहे.

Intro: परभणी - परतीचा पाऊस लांबल्यानेे परभणी जिल्ह्यातील थंडीनेे थोडीशी विश्रांती घेेेेेेतली होती. गेल्या चार दिवसांपासून परभणीतील थंडी कासावगतीने वाढत आहे. आज (गुुुरुवारी) सकाळी तर संपूर्ण परभणी शहर धुक्याखाली झाकोळले होतेे. यामुळे बोचऱ्या थंडीची चाहूल लागली असून, आता लोकांनी अडगळीला ठेवलेले स्वेटर, मफलर, पायमोजे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.Body:येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात आज परभणीचे किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके नीचांकी नोंदवण्यात आले आहे. कमाल तापमान 30 अंश आहे.
परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावत अतिवृष्टी नोंदवली आहे. मौसमात झाला नाही एवढा पाऊस एकट्या ऑक्टोंबर महिन्यात पडल्याने थंडी लांबली होती; मात्र आता गेल्या आठ ते दहा दिवसात पावसाने विश्रांती घेतली आहे परिणामी थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. थंडीचा परिणाम सकाळी विद्यापीठात मॉर्निंग वॉकला जाणार्‍या नागरिकांवर झाला आहे. परभणी येेेथील रेल्वे स्टेशन परिसरात व महामार्गावर थंडीमुळे सकाळी 7 वाजता देखील धुक्याची चादर पसरलेली दिसून येत आहे. तसेच या थंडीचा फटका आता पहाटे दुध, पेपर, भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. ते उशिराने धावत आहेत. तर दिवसभर वातावरणात देखील हळूहळू गारवा येत आहे. त्यामुळे नागरिकांनी कपाटात ठेवलेले मफलर, स्वेटर, पायमोजे, हातमोजे आणि तोंडाला बांधण्यात येणारे स्कार्फ बाहेर काढले आहेत. सायंकाळी थंडीत वाढ होत असून, सकाळी 8 वाजेपर्यंत गारवा कायम राहत आहे. ज्यामुळे सकाळ आणि संध्याकाळची कामे थंडावली असून रस्त्यांवर शुकशुकाट दिसतो. महत्त्वाचे म्हणजे या थंडीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. सर्दी, खोकला, तापीचे रूग्ण वाढत आहेत. सर्व दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. विशेषतः डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये अधिक वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने सर्वत्र मच्छरांची निर्मिती झाली होती. त्यामुळे डेंगू सदृश्य आजार आणि तापीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शहरात धूर फवारणी व आरोग्य जनजागृती केल्या जात आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_Fog_sheet_photo_1, 2 & pbn_Fog_sheet_visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.