ETV Bharat / state

नालासोपाऱ्यात तलवारी घेऊन गुंडांचा राडा, एकास अटक - youth carrying nalasopara palghar

मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला आहे. संजय मिश्रा असे (२२) या जखमी तरुणाचे नाव आहे. त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ३० जूनला हा प्रकार घडला. तलवारी घेऊन दहशत माजवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

youth carrying swords in Nalasopara, one arrested
नालासोपाऱ्यात तलवारी घेऊन गुंडांचा हैदोस, एकास अटक
author img

By

Published : Jul 2, 2020, 11:31 AM IST

Updated : Jul 2, 2020, 1:09 PM IST

नालासोपारा (पालघर) - कोरोनाच्या महामारीने एकिकडे नागरिक त्रस्त आहेत. दुसरीकडे मात्र नालासोपाऱ्यात स्थानिक गुंडांकडून तलवारी घेऊन धुमाकुळ घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना येथील प्रगती नगर परिसरात घडली.

नालासोपाऱ्यात तलवारी घेऊन गुंडांचा हैदोस

मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला आहे. संजय मिश्रा असे (२२) या जखमी तरुणाचे नाव आहे. त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ३० जूनला हा प्रकार घडला. तलवारी घेऊन दहशत माजवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - आज मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत जोरदार पावसाची शक्यता

या संपूर्ण थरारक घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर इतरांचा शोध सुरू आहे. गुंडांच्या या प्रकारामुळे एकंदरीतच कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले पाहायला मिळाले.

Last Updated : Jul 2, 2020, 1:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.